इस्रायलने इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावर केला हल्ला, लाईव्ह शो सोडून अँकरला काढावा लागला पळ

इस्रायलने इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावर केला हल्ला, लाईव्ह शो सोडून अँकरला काढावा लागला पळ

इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धाने आता आणखी भयावह वळण घेतले आहे. इस्त्रायलने इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावर (IRIB) हल्ला केला, ज्यामुळे लाइव्ह प्रसारणादरम्यान अँकरला स्टुडिओ सोडून पळ काढावा लागला. हा हल्ला इतका तीव्र होता की, इराणची राजधानी तेहरानसह अनेक भागांमध्ये स्फोटांचा आवाज घुमला.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलच्या हवाई दलाने इराणच्या संरक्षण मंत्रालय, तेल डेपो, गॅस रिफायनरी आणि आण्विक संशोधन केंद्रांसह 150 हून अधिक ठिकाणांवर हल्ले केले. यामध्ये IRIB च्या मुख्यालयावरही बॉम्बहल्ला झाला. लाइव्ह प्रसारणादरम्यान स्फोटांचा आवाज ऐकू येताच अँकर घाबरली आणि स्टुडिओ सोडून पळ काढला. या हल्ल्यामुळे इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीचे प्रसारण खंडित झाले. सोशल मीडियावर यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी इस्त्रायलला इशारा देताना म्हटले, “इस्रायलला त्याच्या या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागेल.” दरम्यान, इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात चिंता वाढली आहे. अनेक देशांनी दोन्ही बाजूंना संयम राखण्याचे आवाहन केले आहे, परंतु सध्याची परिस्थिती पाहता युद्ध थांबण्याची शक्यता कमी दिसते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;