Ratnagiri News – गोळवली येथे मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन; शेती बागायतीला मोठा फटका, सुपारीची 80 झाडे जमीनदोस्त

Ratnagiri News – गोळवली येथे मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन; शेती बागायतीला मोठा फटका, सुपारीची 80 झाडे जमीनदोस्त

मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील गोळवली परिसरात भूस्खलन झाल्याची घटना सोमवारी (16 जून 2025) पहाटे घडली. डोंगराचा मोठा भाग खचल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूस्खलनामुळे ताम्हण कोंड पऱ्याला नदीसारखा प्रवाह निर्माण होऊन धरणाच्या स्वरूपाचे दृश्य निर्माण झाले. परिणामी, गोळवली वाड्यांकडे जाणारा मुख्य कॉजवे पूर्णपणे बंद झाला आहे.

कुंभारखाणी, करजुवे, धामापूर व संगमेश्वर मार्गावरही भूस्खलन झालं असून हे रस्ते बंद झाले आहेत. यामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या आपत्तीत अमोल लोध यांच्या बागेतील सुमारे 80 सुपारी झाडे जमीनदोस्त झाली असून त्यांची विहीरही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच गावचे तलाठी तांबटकर, ग्रामसेवक जाधव, सरपंच शालिनी पथये, पोलीस पाटील अप्पा पाध्ये व उपसरपंच उदय दुधम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासनाकडून नुकसान भरपाईसाठी अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना डोंगरकडील भागांपासून दूर राहण्याचे, सतर्क राहण्याचे व आवश्यकतेशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;