सनरायझर्स हैदराबादचं वादळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट

सनरायझर्स हैदराबादचं वादळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट

सनरायझर्स हैदराबादने IPL 2025 मध्ये चाहत्यांना निराश केलं. संघाचा खेळ अगदीच सुमार राहिल्यामुळे साखळी फेरीतीच बाद होण्याची नामुष्की संघावर ओढवली. मात्र स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात संघाने दमदार खेळ करत स्पर्धेचा शेवट गोड केला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात लक्ष वेधून घेणारी फलंदाजी केली ती हेन्रीक क्लासेनन. त्याने चौफेर फटकेबाजी करत 39 चेंडूंमध्ये 105 धावांची वादळी खेळी केली. याच क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज म्हणून जगभरात आपल्या नावाचा डंका क्लासेनने वाजवला. आक्रमक फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. फक्त 33 वर्षांच्या असणाऱ्या क्लासेनने अचानक निवृत्तीची घोषणा केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. “हा माझ्यासाठी खूपच दु:खाचा दिवस आहे. कारण मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा करत आहे. हा खूपच कठीन निर्णय आहे,  पण मी पूर्णपणे समाधानी आहे. पहिल्या दिवसापासूनच देशाचं प्रतिनिधीत्व करणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती,” अशी एक भावूक पोस्ट शेअर करत त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.

रिव्हर्स स्विंगसाठी वन डेत नवा प्रयोग, 34 व्या षटकानंतर एकच चेंडू येणार वापरता; आयसीसीचे नवे वन डे नियम 17 जून्पासून लागू

दक्षिण आफ्रिकेसाठी क्सासेनने 4 कसोटी सामने खेळले असून 104 धावा केल्या आहेत. तसेच 60 वनडे सामन्यांमध्ये 2141 धावा केल्या असून टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 58 सामन्यांमध्ये 1000 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर जगभरातील लीग क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने वेळोवेळी आपल्या विस्फोटक फलंदाजीचा जलवा दाखवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या मंत्रिमंडळात अजित पवार हे सर्वात खुश, हे त्यांचं कौतुकास्पद कौशल्य – संजय राऊत या मंत्रिमंडळात अजित पवार हे सर्वात खुश, हे त्यांचं कौतुकास्पद कौशल्य – संजय राऊत
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार खुश होते आणि आताही अजित पवार खुश आहेत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...
रात्री चुकूनही हे पदार्थ खाऊ नयेत, वाचा सविस्तर
गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले सर्वाधिक भ्रष्ट मंत्री, संजय राऊत यांचा घणाघात
Hair Care- ‘या’ घरगुती शॅम्पुच्या वापराने केस होतील घनदाट
वयाच्या 57 व्या वर्षी बाबा होणार अरबाज खान; शुरा लवकरच देणार गुड न्यूज
सोनाक्षीने खाल्ला बीफ बर्गर? पती झहीर स्पष्टच म्हणाला..
IPL 2025: पंजाब किंग्जच्या पराभवानंतर प्रिती झिंटाच्या डोळ्यात अश्रू; चाहतेही झाले भावूक