Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, राजापुरात अर्जुना आणि कोदवली नदीला पूर

Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, राजापुरात अर्जुना आणि कोदवली नदीला पूर

गेले तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना नदी आणि कोदवली नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकात शिरले. पुरामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 113.54 मिमी पावसाची नोंद झाली.

अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराने राजापूर शहरासह ग्रामीण भागाला वेढले आहे. शहरातील बहुतांश भागामध्ये पुराचे पाणी घुसले. ग्रामीण भागातील शिळ-गोठणेदोनिवडे रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यातच अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन, तहसिलदार विकास गंबरे, नगर परिषदेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव यांनी जवाहर चौकामध्ये पूरस्थितीची पाहणी करून लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. तर, प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

दापोली ते दाभोळ रस्त्यावर सकाळी झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. शहरानजीकचा शीळ-गोठणेदोनिवडे रस्ताही पुराच्या पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नद्यांच्या काठावरील शीळ, गोठणोदोनिवडे, आंगले, दोनिवडे आदी गावांमधील भातशेतीही पुराच्या पाण्याखाली गेली होती.

गेल्या 24 तासात जिल्ह्यात 113.54 मिमी पाऊस पडला. त्यामध्ये मंडणगड – 66.50 मिमी, खेड – 107.28 मिमी, दापोली – 96.14 मिमी, चिपळूण – 128.33 मिमी, गुहागर – 136.80 मिमी, संगमेश्वर – 129.50 मिमी, रत्नागिरी – 99.77 मिमी ,लांजा – 139.60 मिमी राजापूर – 118.00 मिमी पाऊस पडला.

दोन नद्यांनी गाठली इशारा पातळी

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. आज सकाळी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी गाठली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;