Dharashiv News – ऑनलाईन जुगाराने कुटुंबाचा शेवट केला, पत्नी आणि दोन वर्षांच्या चिमुकल्याला विष देऊन तरुणाने जीवन संपवलं

Dharashiv News – ऑनलाईन जुगाराने कुटुंबाचा शेवट केला, पत्नी आणि दोन वर्षांच्या चिमुकल्याला विष देऊन तरुणाने जीवन संपवलं

ऑनलाईन जुगार, शेअर मार्केटमध्ये झालेल्या आर्थिक नुकसान झाल्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. याच तणावातून एका तरुणाने आपल्या दोन वर्षांचा चिमुकल्याला आणि पत्नीला विष दिलं आणि त्यानंतर स्वत:ही गळफास घेत जीवन संपवलं आहे. धाराशिव तालुक्यातील बावी येथे घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ऑनलाईन जुगारामुळे एका कुटुंबाचा शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

धाराशिव तालुक्यातील लक्ष्मण मारुती जाधव (29) याला पत्ते खेळण्याचा नाद होता. तो ऑनलाईन रमी खेळायचा. या ऑनलाईन रमीच्या नादात लक्ष्मणच्या डोक्यावर मोठे कर्ज जमा झाले होते. त्यामुळे त्यांनी पत्नी आणि मुलासह जीवन संपवंल. सोमवारी (16 जून 2025) सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नसल्याने गावकर्‍यांनी दरवाजा उघडला असता हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले. जिल्हा पोलिस अधिक्षक रितू खोखर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे. लक्ष्मण जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. त्याने तीन वर्षांपूर्वी गावातील तेजस्विनी हिच्याशी प्रेमविवाह केला होता. त्याला दोन वर्षाचा मुलगा होता. गावकर्‍यांच्या सांगण्यानुसार लक्ष्मण जाधव याने कर्जबाजारीपणातून स्वतःच्या मालकीची एक एकर जमीन तसेच गावातील प्लॉटिंगची जागा विकली होती. यानंतरही तो कर्जबाजारीपणातून मुक्त झाला नव्हता. त्यामुळे तो तणावात होता. दरम्यान, त्याने रविवारी (15 जून 2025) रात्री पत्नी तेजस्विनी तसेच दोन वर्षाच्या मुलाला विष देऊन मारलं आणि त्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व शक्यता गृहीत धरुन तपास करत आहेत. या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;