IND Vs ENG – निवृत्त हो आणि लीग क्रिकेट खेळ, त्यात भरपूर पैसा आहे…; टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूचा करुण नायरला सल्ला

IND Vs ENG – निवृत्त हो आणि लीग क्रिकेट खेळ, त्यात भरपूर पैसा आहे…; टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूचा करुण नायरला सल्ला

करुण नायरने आपल्या फलंदाजीच्या आणि मेहनतीच्या जोरावर टीम इंडियामध्ये आपली जागा पक्की केली आहे. देशांतर्गत क्रिकेट, त्यानंतर आयपीएलमध्येही त्याच्या फलंदाजीची जादू कायम राहिली आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली. सध्या तो टीम इंडियासोबत सराव करत असून त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका माजी हिंदुस्थानी खेळाडूने त्याला आर्थिक दृष्ट्या सक्षण होण्यासाठी निवृत्ती घेऊन टी-20 लीगमध्ये खेळण्यासा सला दिला होता.

करुण नायरने एका मुलाखतीमध्ये त्याचा संघर्ष सुरू असतानाच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. तेव्हा त्याने सांगितले की, त्याला टीम इंडियाच्या एका वरिष्ठ खेळाडूने निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता. तो म्हणाला की, “माझ्या आजही आठवणीत आहे, जेव्हा एका वरिष्ठ खेळाडूने मला फोन केला होता आणि सांगितलं की तु आता निवृत्ती घे, कारण टी-20 लीगमध्ये भरपूर पैसा आहे आणि तोच पैसा तुला सुरक्षित ठेवेल. परंतु मी मनाशी पक्क केलं होतं. मी एवढ्यात हार मानली तर, मी स्वत:ला कधीच माफ करू शकणार नाही. मी कधीच देशासाठी खेळण्याचं स्वप्न सोडून देण्याचा विचार केला नाही. दोन वर्षांपूर्वी मी हार मानली असती तर आज मी इथपर्यंत पोहोचलो नसतो. मनोमन मला नेहमी वाटत होत की, मी यासाठी पात्र आहे.” अस करुण नायर म्हणाला आहे.

टेम्बा नावाचा यशस्वी टेंभा!

करुण नायर सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. देशांतर्गत क्रिकेट गाजवल्यानंतर आयपीएलमध्येही त्याचा दबदबा कायम राहिला. इंग्लंडमध्येही त्याने आपल्या फलंदाजीची धार दाखवून दिली आहे. इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वी इंग्लंड लायन्सविरुद्ध इंडिया A असा सामना पार पाडला. या सामन्यात करुण नायरने द्विशतक झळकावत आपली बॅट अजूनही तळपत असल्याच दाखवून दिलं. 20 जून पासून टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;