Mumbai News – मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांकडून परिसराची कसून तपासणी

Mumbai News – मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांकडून परिसराची कसून तपासणी

मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली. अज्ञाताने ईमेलद्वारे ही धमकी दिली. यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शाळेच्या परिसराची कसून तपासणी केली. मात्र काहीच संशयास्पद आढळले नाही.

देवनारमधील कनकिया इंटरनॅशनल स्कूल आणि कांदिवलीच्या समतानगर परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूलला रविवारी सकाळी ईमेल प्राप्त झाला. या ईमेलमध्ये शाळेचा परिसर आणि मुंबईच्या इतर भागात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला. या धमकीमुळे शाळेचे कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

धमक्यांनंतर, आपत्कालीन सुरक्षा प्रोटोकॉल सक्रिय करण्यात आले. ईमेल पाठवणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध देवनार आणि समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर शाळांमधील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;