वासिंद ते आसनगावदरम्यान मालगाडीत तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक तासभर ठप्प

वासिंद ते आसनगावदरम्यान मालगाडीत तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक तासभर ठप्प

वासिंद ते आसनगावदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी रात्री रेल्वे वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे ऐन पावसात हाल झाले. रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी तब्बल एक तासाने कसार्‍याहून दुसरे इंजिन मागवले. नंतर मालगाडी आसनगावच्या दिशेने रवाना झाली.

इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मालगाडी वासिंद ते आसनगाव दरम्यान डाऊन मार्गावर थांबली. यामुळे कसाराकडे जाणार्‍या लोकलसह मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेससह लांबपल्याच्या अनेक गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;