Women’s World Cup 2025 – पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान आमनेसामने, कधी आणि कुठे होणार टक्कर? ICC ने जाहीर केलं संपूर्ण वेळापत्रक

Women’s World Cup 2025 – पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान आमनेसामने, कधी आणि कुठे होणार टक्कर? ICC ने जाहीर केलं संपूर्ण वेळापत्रक

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर तंबळ युद्ध रंगणार आहे. महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या निमित्ताने दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. महिला वनडे वर्ल्ड कप 30 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. टीम इंडियाविरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला सामना खेळला जाईल. ICC ने वर्ल्ड कपच संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं आहे.

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 5 ऑक्टोबर रोजी रविवारी श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदास स्टेडियमवर भीडत होणार आहे. दोन्ही देशांमधील तणावाच्या परिस्थितीमुळे ICC, BCCI आणि PCB यांच्यात एक सामंजस्य करार झाला असून पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये खेळले जाणार आहेत. वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत टीम इंडियाचे एकून सात सामने खेळणार आहे. पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध (बंगळुरू), दुसरा सामना 5 ऑक्टोबरी रोजी पाकिस्तानविरुद्ध (कोलंबो), तिसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (विशाखापट्टणम), चौथा सामना 12 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (विशाखापट्टणम), पाचवा सामना 19 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध (इंदौर), सहावा सामना 23 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध (गुवाहटी) आणि शेवटचा सामना 26 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध (बंगळुरू) खेळला जाणार आहे.

महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये एकूण 31 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने पाच शहरांमध्ये खेळले जाणार आहेत. या पाच शहरांमध्ये हिंदुस्थानातील बंगळुरू, इंदौर, गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि श्रीलंकेतील कोलंबो शहराचा समावेश आहे. पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळले जाणार आहेत. पहिला सेमी फायनलचा सामना गुवाहाटीमध्ये खेळला जाईल. परंतु जर पाकिस्तानने सेमी फायनलमध्ये धडक मारली तर हा सेमी फायनलचा सामना कोलंबोमध्ये खेळला जाईल. दुसरा सेमी फायनलचा सामना 30 ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये खेळला जाईल आणि वर्ल्ड कपची फायनल 2 नोव्हेंबर रोजी बंगळुरू किंवा कोलंबोमध्ये खेळली जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;