Israel attack on Gaza – इस्राईली सैन्याकडून गाझातील अन्न वितरण केंद्रावर गोळीबार, हल्ल्यात 34 पॅलेस्टिनी ठार

Israel attack on Gaza – इस्राईली सैन्याकडून गाझातील अन्न वितरण केंद्रावर गोळीबार, हल्ल्यात 34 पॅलेस्टिनी ठार

इस्राईलने पुन्हा एकदा गाझाला लक्ष्य केले. गाझाच्या दक्षिण भागातील अन्न वितरण केंद्राजवळ सोमवारी इस्राईलने गोळीबार केला. या गोळीबारात 34 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. हा हल्ला मदत केंद्रांजवळ झालेल्या हल्ल्यापैकी सर्वात प्राणघातक हल्ला असल्याचे गाझातील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

गाझा मानवतावादी फाउंडेशन (GHF) द्वारे ही अन्न केंद्रे चालवली जातात. या केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी हजारो पॅलेस्टिनी अनेकदा इस्रायली लष्कराच्या नियंत्रणाखालील झोनमधून जातात.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणेतील सर्वात वर्दळीच्या मदत केंद्रांपैकी एक असलेल्या रफाह केंद्रावर गर्दी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी पहाटे इस्रायली सैन्याने गोळीबार केला. मात्र इस्रायली सैन्याने याबाबत अद्याप भाष्य केलेले नाही.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गोळीबारात मृत्यू झालेले बहुतेक पॅलेस्टिनी रफाहमधील जीएचएफ केंद्राजवळ तर काही खान युनूसच्या बाहेर नवीन केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर होते. पहाटे 4 वाजता जवळच्या ट्रॅफिक सर्कलवर फ्लॅग राउंडअबाउट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गर्दीवर सैनिकांनी गोळीबार केला, असे रफाह येथील केंद्राजवळ अन्न मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन लोकांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले.

गेल्या महिन्यात केंद्रे उघडल्यापासून मदत मिळवण्याचा प्रयत्न करताना आतापर्यंत डझनभर लोक मारले गेले आणि शेकडो जखमी झाले आहेत. युद्ध आणि मदत वितरणावरील निर्बंधांमुळे गाझामधील परिस्थिती बिकट बनली असून सुमारे 20 लाख लोकांचे जीवन धोक्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;