Beed News – ‘तुझा संतोष देशमुख करतो’ म्हणत तरुणावर कोयत्याने वार, शेतीतील बांधाच्या वादातून बीडमध्ये धक्कादायक प्रकार

Beed News – ‘तुझा संतोष देशमुख करतो’ म्हणत तरुणावर कोयत्याने वार, शेतीतील बांधाच्या वादातून बीडमध्ये धक्कादायक प्रकार

‘तुझा संतोष देशमुख करतो’ म्हणत एका तरुणावर भररस्त्यात कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे. शेतीतील बांधाच्या वादातून ही घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कैलास सांगुळे असं जखमी तरुणाचं नाव असून तो तांदळवाडी भिल्ल गावचा रहिवासी आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास गाडी चालवत असताना चौघांनी त्याची वाट अडवली. यानंतर ‘तुझा संतोष देशमुख करतो’ म्हणत चौघांनी कोयत्याने कैलासच्या डोक्यावर, मानेवर, तोंडावर वार केले. कैलासच्या शरीरावर 100 हून अधिक वार करण्यात आले. हल्ल्यानंतर कैलास बेशुद्ध झाला.

घटनेची माहिती मिळताच कैलासच्या भावाने घटनास्थळी धाव घेत त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. कैलासची प्रकृती चिंताजनक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;