Pune News – कोथरुडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात, तीन ते चार वाहने एकमेकांवर धडकली

Pune News – कोथरुडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात, तीन ते चार वाहने एकमेकांवर धडकली

कुंडमळा येथील घटना ताजी असतानाच पुण्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. कोथरुड येथील वेदभवन पुलावर सोमवारी पहाटेच्या सुमारास तीन ते चार वाहने एकमेकांवर आदळली. अपघातात एका गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. तर अन्य दोन गाड्यांचेही मोठे नुकसान झाले. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच कोथरुड पोलीस, अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या आणि पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करत या मार्गावरील वाहतून सुरळीत करण्यात आली. अपघात नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप समजू शकले नाही. कोथरुड पोलीस अपघातग्रस्त वाहनांची तपासणी आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;