Mumbai News : अंधेरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून कामगाराचा मृत्यू, इमारतीचे बांधकाम सुरू असताना घडली घटना

Mumbai News : अंधेरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून कामगाराचा मृत्यू, इमारतीचे बांधकाम सुरू असताना घडली घटना

इमारतीचे बांधकाम सुरू असताना माती खचल्याने ढिगाऱ्याखाली दबून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरीत सोमवारी घडली. सोनेलाल प्रसाद असे मयत कामगाराचे नाव आहे. या दुर्घटनेत दुसऱ्या कामगाराला वाचवण्यात यश आले आहे. जखमी कामगारांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंधेरीतील मरोळ पाईपलाईन परिसरात लीला बिजनेस पार्क फेझ टू या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी सायंकाळी पावसामुळे बांधाकामाच्या ठिकाणी माती खचली. यावेळी दोन कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला दोन्ही कामगारांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. जखमी कामगारांना तात्काळ कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई महानगरपालिकेकडून या घटनेची चौकशी करण्याची आणि काम बंद करण्याची सूचना देण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;