चपात्या केल्यानंतर उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवताय? आजारांना आमंत्रणच, पोटाच्या समस्या वाढू शकतात

चपात्या केल्यानंतर उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवताय? आजारांना आमंत्रणच, पोटाच्या समस्या वाढू शकतात

आजकालच्या धावपळीच्या जगात सगळ्या कामांसाठी वेळ देणे जरा कठीणच असते. त्यामुळे मल्टीटास्कींग हाच एक पर्याय असतो. त्यात महिलांना जर घरातील कामे करून ऑफिसही असेल तर मात्र त्यांची सर्वात जास्त धावपळ होते. अशा वेळी त्या शॉर्टकट पद्धतींचा अवलंब करतात आणि पटापट काम आवरण्याचं पाहतात. त्यातील एक पद्धत म्हणजे पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवणे.

रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवणे वेळ वाचण्यासाठी असले तरी आरोग्यासाठी खूप हानिकारक

बऱ्याचदा अनेक घरांमध्ये रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवले जाते किंवा चपत्या झाल्यानंतर उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवली जाते. आणि नंतर ती बाहेर काढून मग पोळ्या किंवा चपात्या बनवल्या जातात. असे केल्याने वेळ वाचतो, परंतु आरोग्यासाठी ते किती हानिकारक आहे याची कल्पना कदाचित बऱ्याच जणांना नसते. फ्रिजमध्ये ठेवलेल्या किंवा मळलेल्या कणकेपासून बनवलेल्या चपात्या जास्त काळ खाणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. मळलेले पीठ फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्यात रसायने तयार होऊ लागतात जी हानिकारक असतात. चला जाणून घेऊया फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ आरोग्याला कसे हानिकारक असते ते.

तुम्ही किती वेळ मळलेले पीठ ठेवू शकता?

पोटदुखी

बराच काळ साठवलेल्या पिठापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्याने पोटदुखी किंवा पोट खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

आम्लता

मळलेले पीठ साठवल्याने मायकोटॉक्सिन होतात ज्यामुळे आम्लतेची समस्या उद्भवू शकते

पोषणाचा अभाव

मळलेले पीठ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यात पोषणाची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे शरीरालाही काहीही पोषण मिळत नाही. म्हणून, ताज्या पीठापासून बनवलेल्या चपात्या खाण्याचा प्रयत्न करा

अन्न विषबाधा

रेफ्रिजरेटरमध्ये जास्त काळ ठेवलेल्या पिठापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्यानेही विषबाधेची समस्या उद्भवू शकते.

कणिक किती वेळ ठेवावी?

जर तुम्हाला पीठ मळून ठेवायचंच असेल तर तुम्ही ते 2 ते 3 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. जर तुम्हाला खूप गरज असेल तर तुम्ही 6 ते 7 तासांसाठी ठेवू शकता. पण तरी देखील ताजे पीठ वापरण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्हाला अगदीच एखाद्या वेळी घाई आहे  तर पिठ मळून झाल्यानंतर त्या कणकेला तेल किंवा तूप लावून हवाबंद डब्यात ठेवा. आणि शक्यतो काचेचा डबा किंवा कंटेनर वापरता आलं तर उत्तम.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;