Ratnagiri News – रत्नागिरीत अंमली पदार्थ विकणारी साखळी तोडून टाकणार, पोलीस अधीक्षक नितीन बगाटेंचा कडक इशारा
मी अतिशय संवेदनशील जिल्ह्यातून शांतता असलेल्या जिल्ह्यात आलो आहे. रत्नागिरी जिल्ह्यात असलेली शांतता भंग होऊ देणार नाही, अशा शब्दात रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपली भूमिका पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.
रत्नागिरीत अंमली पदार्थ विकणारी साखळी तोडून टाकणार, अशा कडक शब्दात त्यांनी ड्रग्जमाफियांना इशारा दिला आहे. नितीन बगाटे शनिवारी (24 मे 2025) छत्रपती संभाजीनगर येथून रत्नागिरीत दाखल झाले आणि त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “मी 2021 ते 2023 या काळात सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर काम केले आहे. मी रत्नागिरीतही दोन वेळा आलो आहे. त्यामुळे कोकण मला माहित आहे. मी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर सारख्या जिल्ह्यात काम केले आहे. तिथून मी शांतता असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात आलो आहे. रत्नागिरीची शांतता भंग होणार नाही”, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
पोलिसांच्या फिटनेससंदर्भात बोलत असताना ते म्हणाले की, “पोलिसांनी फिट असले पाहिजे. येणाऱ्या तक्रारदाराशी व्यवस्थित संवाद साधला पाहिजे. कामात पारदर्शकता पाहिजे. एखाद्या घटनेनंतर तात्काळ प्रतिसाद देता आला पाहिजे. याकरिता मी प्रयत्नशील रहाणार आहे”, असे नितीन बगाटे यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List