डिग्री MBBSची, आठ महिन्यांत 50 रुग्णांवर हृदयाची शस्त्रक्रिया, अशी झाली मुन्नाभाईची पोलखोल

डिग्री MBBSची, आठ महिन्यांत 50 रुग्णांवर हृदयाची शस्त्रक्रिया, अशी झाली मुन्नाभाईची पोलखोल

बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे हृदयविकाराशी संबंधित उपचार आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे. प्रत्यक्ष MBBS ची डिग्री असताना स्वतःला हृदयरोग तज्ज्ञ असल्याचे भासवून या डॉक्टरने आतापर्यंत 50 हून अधिक रुग्णांवर हृदयरोग शस्त्रक्रिया केली आहे. यापैकी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका पीडित रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या नकली हृदयरोग तज्ज्ञाची पोलखोल झाली. डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सखोल तपास करीत आहेत.

डॉ. पंकज मोहन शर्मा असे आरोपीचे नाव असून तो फरीदाबाद येथील बादशाह खान सिव्हिल रुग्णालय संचालित एका हार्ट सेंटरमध्ये काम करत होता. आरोपी एका कार्डिओलॉजिस्टचा रजिस्टर नंबर वापरत होता. तसेच त्याच्याकडे बनावट स्टॅम्पही होता. फरीदाबाद येथे ही घटना उघडकीस आली आहे.

एका रुग्ण नकली डॉ. शर्माकडे उपचार घेतल्यानंतर खरा कार्डिओलॉजिस्ट डॉ. पंकज शर्माकडे गेला आणि मेडिकल रिपोर्ट दाखवले. यानंतर खऱ्या डॉक्टरने मेडिकल रिपोर्टवरील आपला रजिस्ट्रेशन नंबर ओळखला. त्यानंतर आपले नाव, रजिस्ट्रेशन क्रमांक आणि कागदपत्रांचा गैरवापर होत असल्याचे डॉक्टरच्या लक्षात आले. यानंतर नकली कार्डिओलॉजिस्टचा पर्दाफाश झाला.

पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर नकली डॉ. शर्मा फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;