98 लाखांचे हिरे घेऊन हिरे व्यापाऱ्याचे पलायन

98 लाखांचे हिरे घेऊन हिरे व्यापाऱ्याचे पलायन

सुमारे 98 लाख रुपयांचे हिरे घेऊन एका हिरे व्यापाऱ्याने पलायन केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्या व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. यातील तक्रारदार हिरे व्यापारी असून त्यांची बीकेसी एक खासगी कंपनी आहे. याच कंपनीतून त्यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवहार चालतो. एप्रिल महिन्यात त्यांना त्यांच्या ओळखीच्या हिरे व्यापाऱ्याने पलक मेहता या हिरे व्यापाऱ्याशी ओळख करून दिली. त्यांनी पलकला त्यांच्यासोबत व्यवहार करायचे असून त्याच्याकडे चांगले ग्राहक आहे, असे सांगण्यात आले. त्यांच्या सांगण्यावरून व्यापाऱ्याने पलकसोबत हिऱ्यांचा व्यवहार सुरू केला होता. एप्रिल महिन्यात त्यांच्याकडून पलक मेहता याने क्रेडिटवर 98 लाखांचे हिरे विक्रीसाठी घेतले. 15 दिवसांत व्यवहार पूर्ण करतो असे सांगून तो निघून गेला. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिऱ्यांचे पैसे दिले नाही किंवा हिरे त्यांना परत आणून दिले नाहीत. याप्रकरणी पलकविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;