अकरावी प्रवेश प्रक्रिया, दोन दिवसांत 9 हजार विद्यार्थ्यांनी निवडले कॉलेज

अकरावी प्रवेश प्रक्रिया, दोन दिवसांत 9 हजार विद्यार्थ्यांनी निवडले कॉलेज

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा भाग 2 (कॉलेज निवड) भरण्यासाठी शिक्षण संचालनालयाने मुदत वाढवून दिली होती. या मुदतीत 9 हजार विद्यार्थ्यांनी कॉलेज निवड केली आहे. भाग 2 भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 11 लाख 38 हजार इतकी झाली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी नियमित फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला 26 मेपासून सुरुवात झाली. अर्ज नोंदणीच्या अखेरच्या दिवशी 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी 12 लाख 15 हजार 190 विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क जमा केले. त्यापैकी 12 लाख 5 हजार 162 विद्यार्थ्यानी अर्जाचा भाग 1 भरला तर 11 लाख 29 हजार 924 विद्यार्थ्यांनी भाग 2 भरून अर्ज निश्चित  केला. भाग 1 भरलेला, परंतु भाग 2 भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 75 हजार होती. या विद्यार्थ्यांची नियमित फेरीची संधी वाया जाऊ नये यासाठी शिक्षण संचालनालयाने अर्जाचा भाग 2 भरण्यास मुदतवाढ दिली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;