श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजचा कसोटी क्रिकेटला गुडबाय
श्रीलंकेचा महान अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने आपली 17 वर्षांची दीर्घ कसोटी कारकीर्द थांबविण्याचा आज निर्णय घेतला. पुढच्या महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर तो कसोटी क्रिकेटला गुडबाय करणार आहे. त्याचा शेवटचा कसोटी सामना 17 ते 21 जूनदरम्यान गॉल येथे खेळला जाणार आहे. मात्र, 37 वर्षीय मॅथ्यूज हा पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटसाठी म्हणजेच वन डे आणि टी-20 क्रिकेटसाठी उपलब्ध असणार आहे.
आज मॅथ्यूजने ‘आता खेळाच्या सर्वात अद्भुत स्वरूपातून अर्थातच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची वेळ आली आहे. जूनमध्ये बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना हा माझा देशासाठी शेवटचा कसोटी सामना असेल. मी कसोटी प्रकारातून निवृत्त होत आहे, पण पांढऱ्या चेंडूच्या स्वरूपात खेळण्यासाठी उपलब्ध असेल. आता तरुण पिढीने कसोटी क्रिकेटची सूत्रे हाती घेण्याची वेळ आली आहे,’ असे मॅथ्यूजने निवृत्तीच्या घोषणेवेळी सांगितले.
2009 मध्ये पदार्पणापासून मॅथ्यूजने 118 कसोटी सामन्यांमध्ये 8167 धावा केल्या आहेत. कुमार संगक्कारा (12,400) आणि महेला जयवर्धने (11,814) नंतर श्रीलंकेच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. श्रीलंका क्रिकेटने त्यांच्या योगदानाचे कौतुक केले आणि त्यांना ‘श्रीलंका क्रिकेटचा खरा सेवक’ असे संबोधले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List