Skin Care- चेहरा सुंदर आणि टवटवीत होण्यासाठी बीट आहे बहुमोली

Skin Care- चेहरा सुंदर आणि टवटवीत होण्यासाठी बीट आहे बहुमोली

आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी बीटरूटचा वापर केला जातो. चेहऱ्यासोबत आपण आरोग्यासाठीही बीट आहारात समाविष्ट करतो. हेच बीट आहारात समाविष्ट केल्यास आपण निरोगी ताजे टवटवीत राहतो. मुख्य म्हणजे बीटाचा उपयोग आपण सौंदर्यासाठी सुद्धा करु शकतो. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी आपण अनेक गोष्टी वापरतो. याशिवाय, आपण चेहऱ्यावरील दिसणारे डाग लपवण्यासाठी मेकअप देखील करतो. चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी आपण हेवी मेकअप देखील करतो. यापेक्षा आपण त्वचेला नैसर्गिक उपाय करणे हे केव्हाही इष्ट.. बीटचा रस हा चेहऱ्यासाठी वरदान मानला जातो. याच बीट रसाचे चेहऱ्यासाठी काय फायदे होतात ते पाहूया.

बीट रसाचे फायदे

बीटाचा रस दररोज चेहऱ्यावर लावल्यास, ब्लशची गरज भासणार नाही. तसेच त्वचाही कोरडी होणार नाही. पुरळ, काळी वर्तुळे आणि टॅनही दिसणार नाही.

बीटाचा रस थेट चेहऱ्यावर लावू शकत नसाल तर, बीटचा रस दही किंवा कोरफडीच्या जेलमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावणे चांगले. हा फेस पॅक लावल्याने तुमची त्वचा चमकदार दिसेल. शिवाय, तुमची त्वचा स्वच्छ होईल.

ताज्या काढलेल्या बीटाचा रस चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहील आणि चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक येईल.

बीटाचा रस हा अनेकांना प्यायला आवडतो. अनेकांच्या रुटीनचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. हाच रस आपण चेहऱ्यावरही लावु शकतो.

बीट रस चेहऱ्यावर लावल्यावर त्वचेला नैसर्गिक तजेला प्राप्त होतो. त्वचा गुलाबी दिसू लागते, तसेच बीटामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेला सुरकुत्या देखील येत नाहीत.

बीटाचा रस लावल्याने, त्वचा हायड्रेट राहते. डागांची समस्याही कमी होते.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;