अक्षय कुमार पत्नी किंवा मुलांचा नाही, तर या खास व्यक्तीचा फोटो त्याच्या पाकिटात ठेवतो, सर्वांनाच वाटलं कौतुक
बॉलिवूडमधील असे काही चित्रपट आहेत ज्याचे एकापेक्षा जास्त भाग निघाले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे हाऊसफुल. या चित्रपटाचे चार भाग यशस्वी झाल्यानंतर आता ‘हाऊसफुल 5’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘हाऊसफुल 5’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तसेच ‘हाऊसफुल 5’च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. यावेळी सर्वच कलाकारांनी पत्रकार परिषदेत त्यांचे अनुभव शेअर केले तसेच पत्रकांरांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. यावेळी अक्षय कुमारला पत्रकरांनी फक्त चित्रपटाबाबतच नाही तर त्याच्या काही वैयक्तिक गोष्टींबाबतही प्रश्न विचारले. त्यातील एका प्रश्नाला उत्तर देताना अक्षयने त्याचं एक गुपित उघड केलं आहे.
अक्षय कुमारच्या पाकिटात या व्यक्तीचा फोटो
अॅक्शनसोबतच, अक्षय कुमार हिंदी चित्रपटांमध्ये त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी देखील ओळखला जातो. त्याच्या वयोगटातील फार कमी कलाकार त्याच्यापेक्षा चांगले विनोद करू शकतील. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे असते की तो विनोदात कोणाला आपला गुरु मानतो. मंगळवारी त्याच्या आगामी ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत अक्कीला असाच काहीसा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने त्याच्या पाकिटातील एक फोटो बाहेर काढून सर्वांना दाखवला. तो फोटो पाहून सर्वांनाच फार कौतुक वाटलं.
अक्षय कुमारसाठी हा व्यक्ती म्हणजे खरा आदर्श
अक्षय कुमारने त्याच्या पाकिटात ज्या व्यक्तीचा फोटो ठेवला होता तो फोटो त्याच्या पत्नी, मुले किंवा त्याच्या आई-वडिलांचा नव्हता तर तो फोटो तो आदर्श मानत असलेल्या त्या खास व्यक्तीचा आहे. ज्यांनी त्याच्या आयुष्यावर फार प्रभाव टाकला आहे. ती खास व्यक्ती म्हणजे चार्ली चॅप्लिन. अक्षयने सर्वांना हा फोटो दाखवत म्हटलं की, “मी चार्ली चॅप्लिनचा खूप मोठा चाहता आहे. त्यांनी न बोलता ज्या पद्धतीने विनोद केला ते सोपे काम नव्हतं. जेव्हा तुम्ही एकही शब्द न बोलता, फक्त तुमच्या हावभावांनी लोकांना हसवू शकता तेव्हा ती खूप मोठी गोष्ट असते. म्हणूनच मला ते आवडतात. मी त्यांचा फोटोही माझ्या पर्समध्ये नेहमी ठेवतो.” अक्षयच्या गोष्टीचं सर्वांना फारच कौतुक वाटलं.
‘हाऊसफुल 5’ कधी रिलीज होणार?
‘हाऊसफुल 5’ या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, सोनम बाजवा, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लीव्हर, आणि डिनो शर्मा हे स्टार्स दिसणार आहेत. ‘हाऊसफुल 5’मध्ये नाना पाटेकर यांचीही एका महत्त्वाची भूमिका दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा खूप कॉमेडी आहे. दरम्यान चित्रपट 6 जून रोजी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेल असं सध्या दिसत आहे. दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नाना पाटेकर हटके अंदाज आणि देसी लूकमध्ये दिसत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List