भारत-पाकिस्तान तणावानंतर ‘भूल चूक माफ’ सिनेमाचा मार्ग मोकळा, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

भारत-पाकिस्तान तणावानंतर ‘भूल चूक माफ’ सिनेमाचा मार्ग मोकळा,  उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Bhool Chuk Maaf: अभिनेता राज कुमार राव याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण आता अभिनेत्याचा ‘भूल चूक माफ’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण आता सिनेमाचा वाद मिटला आहे. राजकुमार रावचा ‘भूल चूक माफ’ 23 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आहे. मोठ्या पडद्यावर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कधीही ओटीटीवर प्रसिद्ध करण्याची मुभा निर्मात्यांना न्यायालयाकडून मिळाली आहे.

अखरे राज कुमार राव अभिनित ‘भूल चूक माफ’ या सिनेमाचा सिनेमागृहात प्रसिद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिनेमा येत्या 23 मे रोजी प्रदर्शित होणार असून त्यानंतर, सिनेमाचे निर्माते सिनेमा ओटीटीवर कधीही प्रदर्शित करू शकतील… असं देखील सांगण्यात येत आहे.

चित्रपटगृहात सिनेमा प्रसिद्ध झाल्यानणार आठ आठवड्यांनी सिनेमा ओटीटीवर प्रसिद्ध करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड आणि सिनेमाची निर्मिती करणाऱ्या मॅडॉकतर्फे ही माहिती गुरूवारी उच्च न्यायालयात देण्यात आली.

सदर माहिती मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवून घेतली. सांगायचं झालं तर, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपट 16 मे रोजी थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता.

या निर्णयाविरोधात पीव्हीआर आयनॉक्सने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, सिनेमाच्या ओटीटी प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने पीव्हीआरची बाजू योग्य मानून सिनेमाच्या ओटीटी प्रदर्शनाला अंतरिम स्थगित दिली होती.

मात्र या निर्णयाला मॅडॉकने उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती कमल खाता आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे गुरूवारी मॅडॉकच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी, सिनेमाच्या सिनेमागृह आणि ओटीटी प्रदर्शनाबाबत परस्पर सहमतीने घेतलेल्या निर्णयाची पीव्हीआर आणि मॅडॉकने न्यायालयात लेखी माहिती सादर करण्यात आली त्यानंतर, मॅडॉक कधीही सिनेमा ओटीटीवर प्रसिद्ध करू शकेल, असं देखील नमूद करण्यात आले आहे.

शर्मा दिग्दर्शित ‘भूल चुक माफ’ हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे. सिनेमात राजकुमार राव आणि वामिका गूब्बी हिच्यासोबत संजय मिश्रा, रघुबीर यादव, जाकिर हुसैन यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;