अनुष्का शर्माने का सोडली गव्हाची चपाती अन् गायी-म्हशींचे दूध? खाते या पिठापासून बनवलेली रोटी अन् पिते या पदार्थापासून बनवलेलं दूध
अनुष्का शर्मा तिच्या दमदार अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही खूप प्रसिद्ध आहे. इतकेच नव्हे तर ती स्वतःला फिट आणि निरोगी ठेवण्यातही पारंगत आहे. दोन मुलांची आई असूनही अनुष्का शर्मा स्वतःला अतिशय उत्तमरित्या सांभाळत आहे.तिचे डाएट प्लान नेहमीच चर्चेत असतात. जसं की ती गव्हाची चपाती, साखर आणि गायी-म्हशींचे दूध न पिता त्याऐवजी दुसरे पर्याय वापरते.
फिटनेसबद्दल अनुष्काचे विचार
अनुष्का शर्माने भारतीय क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केले आहे. विराट, एक खेळाडू असल्याने स्वतःला पूर्णपणे फिट ठेवतो. त्यामुळे विराटशी लग्नानंतर अनुष्काही तिच्या आरोग्य आणि फिटनेसबाबत खूप जागरूक झाली आहे. ती नियमित व्यायामासोबतच तिच्या निरोगी आहाराकडेही पूर्ण लक्ष देते.
एका मुलाखतीत अनुष्काने सांगितले होते की, ती जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यापेक्षा योगाला प्राधान्य देते. ती दिवसातून दोन वेळा योग करते आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवते. योगासाठी ती अनेकदा घरापासून दूर अंतरावर असणाऱ्या माउंटेन भागात चालणे पसंत करते.
कसा असतो अनुष्काचा आहार?
व्यायाम आणि योगाव्यतिरिक्त, अनुष्का शर्मा तिच्या आहाराकडेही विशेष लक्ष देते. तिच्या आहारात पोषक तत्त्वांनी युक्त पदार्थांचा समावेश असतो. ती प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार घेते आणि दिवसभरात थोड्या थोड्या प्रमाणात जेवण घेते.
अनुष्का तिच्या खाण्यापिण्याबाबत खूप सावध असते. ती अनेक पदार्थांपासून पूर्णपणे दूर राहते. तिने एका मुलाखतीत सांगितले की, ती गव्हाच्या पिठापासून बनलेली चपाती किंवा ग्लूटेनयुक्त कोणतेही धान्य खात नाही. ती खास प्रकारच्या चपात्या खाते, ज्या तिला तंदुरुस्त आणि आकर्षक शरीरयष्टी राखण्यास मदत करतात. ती संतुलित आहार घेते आणि काही पदार्थांपासून कटाक्षाने दूर राहते.
अनुष्काची या पीठाची चपाती खाते अन् पिते या पदार्थांचे दूध
अनुष्का गव्हाच्या चपातीपेक्षा ती राजगिरा , ज्वारी, बाजरी, क्विनोआ यासारख्या पिठापासून बनवलेल्या चपात्या खाण्यास प्राधान्य देते. तसेच गायी-म्हशींचे दूध पिण्याऐवजी बदामाचे दूध किंवा सोया दूध यासारख्या पर्यायांचा वापर करते. ती तिच्या आहारात ग्लूटेनयुक्त कोणताही पदार्थ समाविष्ट करत नाही. तसेच, ती साखर, दूध आणि त्यापासून बनलेले पदार्थ खाण्याचे कटाक्षाने टाळते. ती या सर्व गोष्टींच्या पर्यायांना उत्साहाने स्वीकारते.
अनुष्काचा दैनंदिन आहार
अनुष्का शर्माने सोशल मीडियावर सांगितले होते की, ती सकाळची सुरुवात फळे, चिया सीड्स आणि ज्यूसने करते. त्यानंतर ती पनीर आणि नारळ पाण्यासोबत टोस्ट खाते. दुपारच्या जेवणात अनुष्का दोन चपात्या, डाळ, भाजी आणि सॅलड खाण्यास प्राधान्य देते. तर रात्रीच्या जेवणात ती सोया दूध किंवा सूप घेणे पसंत करते. अनुष्का शर्माची ही फिटनेस आणि आहार योजना तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. तिच्या संतुलित जीवनशैलीमुळे ती नेहमीच चर्चेत असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List