Nitesh Rane : हा भाऊचा धक्का, कराची बंदर नाही, हिरव्या सापांची….नितेश राणेंकडून वॉर्निंग
कणकवलीचे आमदार आणि राज्याचे मत्स्यमंत्री नितेश राणे यांनी आज भायखळा येथील भाऊचा धक्का बंदराला भेट दिली. भाऊचा धक्क्यावर कोळणींकडून मासेविक्री चालते. अलिबागला जाणाऱ्या फेरी बोट इथून सुटतात. आज अचानक नितेश राणे यांनी भाऊचा धक्का बंदराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “काही दिवसांपूर्वी कोळी बांधवांना भेटलो. इथे काही बांगलादेशी रोहिंग्यांच बेकायदेशीर वास्तव्य आहे. आमच्या कोळी बांधवांना मच्छी विक्री करू देत नाही. महिलांवर हात उचलले, तक्रार माझ्याकडे आली” असं मंत्री नितेश राणे म्हणाले.
“म्हणून हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते इथे आज आलो. केंद्र सरकारने कडक नियम लावले आहेत. एकही बांग्लादेशी रोहिंगा इथे राहता कामा नये. हिरव्या सापांची वळवळ भाऊच्या धक्क्यावर खपवून घेणार नाही. यापुढे भाऊच्या धक्क्यावर बारीक लक्ष असेल” असं नितेश राणे म्हणाले. “हे कराचीच बंदर नाही. भाऊचा धक्का आहे. प्रत्येक कागद पत्र तपासली जातील. बांगलादेशींवर कडक कारवाई केली जाईल” असं नितेश राणे म्हणाले.
पोलिसांना आणि सबंधित अधिकाऱ्यांना झापलं
“स्वातंत्र्य वीर सावकारांनी सांगितलं होतं हिंदुना हिंदूंकडून त्रास आहे. आमच्या कडचे जे मदत करतात, त्यांनी विचार करावा. आपण कोणत्या हिरव्या सापांना मदत करतो याचा विचार आपल्यातल्या लोकांनी करावा” असं नितेश राणे म्हणाले. नितेश राणे यांनी पोलिसांना आणि सबंधित अधिकाऱ्यांना झापलं.
पाकिस्तानात त्यांच्या अब्बाकडे पाठवायची सोय करू
भाऊचा धक्का परिसरात बांगलादेशीचा वावर असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर नितेश राणे यांनी भेट दिली. “पुन्हा कोणी बांगलादेशी या ठिकाणी दिसला तर अधिकाऱ्यांना धारेवर धरणार” असं नितेश राणे म्हणाले. “योग्य ती पडताळणी करूनच इथे बसू द्यायची जबाबदारी घ्या. पश्चिम बंगालमधून खोट्या कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी आणि रोहिंगे या ठिकाणी येतात तर कारवाई का नाही?” पोलिसांना नितेश राणे यांचा सवाल. “इथे फक्त हिंदू काम करतील. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना स्थान नाही. अशा लोकांना समुद्रमार्गे पाकिस्तानात त्यांच्या अब्बाकडे पाठवायची सोय करू” असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List