एचडीएफसी बँकेनेही एफडीवरील व्याजदर घटवले
कॅनरा बँक आणि एसबीआयनंतर आता एचडीएफसी बँकेनेसुद्धा मुदत ठेव म्हणजेच एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. नव्या व्याजदरांनुसार, सामान्य नागरिकांना 1 वर्षाच्या एफडीवर 6.50 टक्के व्याज मिळेल, तर 2 वर्षांच्या एफडीवर 6.70 टक्के व्याजदर, 3 वर्षांच्या एफडीवर 6.55 टक्के व्याजदर आणि 5 वर्षांच्या एफडी ठेवीवर 6.30 टक्के वार्षिक व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 7.35 टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एसबीआय बँकेने एफडी व्याजदरात 0.20 टक्के कपात केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List