India-Pakistan Tension – ‘ऑपेरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी! अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याची सडकून टीका

India-Pakistan Tension – ‘ऑपेरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी! अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याची सडकून टीका

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. तरीही हिंदुस्थानने यावर मात करून पाकड्यांना धडा शिकवला. हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरने पाकड्यांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. यामुळे हिंदुस्तानी सैन्याच्या या शौर्याचे राष्ट्रीयच नाही तर, आंतराष्ट्रीय स्तरावरही कौतुक झाले. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी अधिकारी आणि American Enterprise Institute चे वरिष्ठ अधिकारी माइकल रुबिन यांनी देखील हिंदुस्थानी सैन्याच्या कामगिरीचे कौतुक केले. हिंदुस्थानने केवळ लष्करीच नव्हे तर राजनैतिकदृष्ट्याही विजय मिळवला आहे, असे ते म्हणाले.

Operation Sindoor – पाकिस्तान भिकारी नंबर 1! राजनाथ सिंहांनी चित्रपटाचा डायलॉग सांगत घेतला समाचार

मायकल रुबिन यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत हिंदुस्थानच्या कामगिरीवर भाष्य केलं. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानची दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली आणि हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. त्यामुळे पाकिस्तान आता खोटेपणा आणि भ्रमाच्या जगात राहू शकत नाही. पाकिस्तानचे सैन्य हे युद्ध वाईटरित्या हरले आहेत. या वस्तुस्थितीला आता पाकिस्तान धुडकावू शकत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या सद्यस्थितीची तुलना एका घाबरलेल्या कुत्र्याशी केली. पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे, जो एखाद्या परिस्थितीला घाबरून पळ काढतो. पाकिस्तान आता फक्त युद्ध थांबवण्यासाठी याचना करत आहे. संपूर्ण जगाचे लक्ष आता पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या धोरणावर केंद्रीत झाले आहे, असे ते यावेळी म्हणाले.

पाक सैन्य म्हणजे “कर्करोग”

रुबिन यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत लष्करी नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जनरल असीम मुनीर आणि त्यांच्यासारखे अधिकारी खरोखरच त्यांच्या नोकऱ्या टिकवून ठेवू शकतील का? याचा विचार करावा. पाकिस्तानी सैन्य आता एक “कर्करोग” बनले आहे जे केवळ देशाच्या राजकारण आणि अर्थव्यवस्थेवरच परिणाम करत नाही तर संपूर्ण समाजावर याचा परिणाम होत आहे, असे ते यावेळी म्हणाले.

Operation Sindoor – 4 दिवसांत हिंदुस्थानने पाकड्यांना धुळ चारली, मोठी हानी झाली; न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यायालयातच पीडितेला प्रपोज, बलात्काराच्या आरोपीची शिक्षा स्थगित; नेमकं प्रकरण काय? न्यायालयातच पीडितेला प्रपोज, बलात्काराच्या आरोपीची शिक्षा स्थगित; नेमकं प्रकरण काय?
सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी एका प्रेमाची दुसरी गोष्ट पहायला मिळाली. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी असलेल्या आरोपीने न्यायालयात पीडितेला...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुनील तटकरेंचे एक घाव दोन तुकडे, स्पष्टच सांगितलं..
लग्न, फसवणुक आणि षडयंत्र; इंटीमेट सीन्सचा भडीमार आहे या सिनेमांमध्ये
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा देण्यास विलंब का होतोय? आदित्य ठाकरे यांचा म्हाडाला सवाल
रिसॉर्टमधील तंबू कोसळून पर्यटक तरुणीचा मृत्यू, तीन जण जखमी
भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील 5 जण ठार; 8 गंभीर जखमी
अभिनेता गोविंदाची डाळिंब,आंब्याच्या फळबांगाना भेट; शेतकऱ्याचं केलं कौतुक तर गावकऱ्यांशी गप्पा