गुंतवणुकीचे नवे मार्ग

गुंतवणुकीचे नवे मार्ग

>> अजय वाळिंबे

आजची नवीन पिढी म्हणजे ‘मिलेनियल्स’ किंवा ‘जेन झी’ ही आर्थिकदृष्टय़ा अधिक सजग आहे. त्यांच्या गुंतवणुकीच्या पद्धती पारंपरिक गुंतवणूकदारांपेक्षा वेगळ्या आहेत. पूर्वीच्या काळी गुंतवणूक म्हटली की लोक फक्त बँक एफडी, पोस्ट ऑफिस, विमा योजना, सोनं किंवा रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवत. गेल्या 25 वर्षांत बचतीकडून मोठा मध्यमवर्गीय गुंतवणुकीकडे वळला आहे. आता गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. शेअर बाजार, आयपीओ, म्युच्युअल फंड, एसआयपी, ईटीएफ, क्रिप्टो करन्सी, रोबो-अॅडव्हायजर्स, कर्ज आधारित प्लॅटफॉर्म्स अशा आधुनिक गुंतवणुकीच्या मार्गांनी नवीन पिढीला आकर्षित केलं आहे.

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. दिवस रविवार, सकाळी 7 वाजता… मुंबई-ठाणे लोकलमधून प्रवास करताना माझ्यासमोर काही तरुण गप्पा मारत होते. बोलता बोलता विषय गुंतवणुकीवर आला. कुठलासा एक आयपीओ दुसऱया दिवशी बंद होत होता आणि ही संधी त्याला घालवायची नव्हती. त्याने मोबाईलवरून केवळ दोन मिनिटांत त्या आयपीओला अप्लाय करून टाकलं. अर्थात यात आता काही नवीन वाटत नसलं तरीही मला 30 वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. तो आयपीओचा फॉर्म आणा, भरा, त्याला चेक लावा, नंतर ब्रोकरकडे नेऊन द्या नाहीतर स्वत बँकेत जाऊन भरा. त्याची स्लिप जपून ठेवा आणि तीन महिने अलॉटमेंटची वाट पाहा. तोपर्यंत पैसे अडकलेले. आता आयपीओ अप्लाय करणे केवळ दोन मिनिटाचं काम. तेसुद्धा तुमचे पैसे डेबिट न होता आणि इश्यू संपल्यावर चार दिवसांत लिस्टिंग. सगळं सोपं, वेगात, अचूक. भारतीय अर्थव्यवस्था गेल्या तीन दशकांत वेगाने विकसित होत आहे. सेबी, एनएसडीएल, सीडीएसएल, त्याचबरोबर, भारतीय शेअर बाजारातील बदलांनी गुंतवणुकीच्या संधींचे स्वरूपही पूर्णपणे बदलले आहे.

आधुनिक गुंतवणुकीचे पर्याय
मोबाईल ट्रेडिंग अॅप्स :
 झेरोधा, अपस्टॉक्स, एंजल वन, ग्रो इ. विविध अॅप्सनी ट्रेडिंग आणि गुंतवणूक सोपी केली आहे. ऑनलाइन पद्धतीने 10 मिनिटात ईकेवायसीद्वारे डीमॅट खाते उघडून तुम्ही शेअर बाजार, फॉरेक्स, डेरवेटीव, कोमोडिटी इ. ट्रेडिंग चालू करू शकता. अशी अॅप्स विश्लेषणासाठी रियल-टाइम डेटा, चार्टस्, अलर्टस् देतात.

म्युच्युअल फंड :  
म्युच्युअल फंड हे कमी भांडवलातून विविध स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचं प्रभावी साधन आहे. एसआयपी ही विशेषत युवा पिढीसाठी सोपी पद्धत आहे.

एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) : ईटीएफ हे शेअरप्रमाणे ट्रेड होणारे फंड आहेत. कमी खर्चात विविध शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी ईटीएफ देतात. हे तरुण गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत, कारण त्यात पारदर्शकता, लिक्विडिटी आणि कमी खर्च आहे.

आयपीओ : नवीन कंपन्या बाजारात येताना आयपीओ काढतात. तरुण गुंतवणूकदार आयपीओमध्ये गुंतवणूक करून अल्पावधीत उत्तम फायदा मिळवतात. गुंतवणूकदारांचा वाढता प्रतिसाद पाहता गेल्या आर्थिक वर्षात भारतात 79 कंपन्यांनी सुमारे 1.63 लाख कोटी रुपये आयपीओद्वारे जमा केले आहेत.

क्रिप्टो करन्सी:  बीट- कॉइन, सोलाना यासारख्या क्रिप्टो करन्सीजनी तरुण पिढीत प्रचंड उत्सुकता निर्माण केली. डिजिटल चलनातील उतार-चढाव हा मोठा धोका असला तरी, कमी वेळेत जास्त परताव्याची शक्यता तरुणांना आकर्षित करते.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स : नवीन पिढीसाठी गुंतवणूक सल्ला देणारी डिजिटल साधने म्हणजे रोबो-अॅडव्हायझर्स. त्यात एआय आणि डेटा अॅनालिटिक्सद्वारे तुमच्या गुंतवणुकीसाठी पोर्टफोलिओ तयार केला जातो. अनेक म्युच्युअल फंडदेखील याचा वापर करतात.

भारतीय शेअर बाजारातील बदल आणि आधुनिक गुंतवणुकीची साधने तरुण पिढीसाठी खूप आकर्षक बनली आहेत. या साधनांमुळे वित्तीय साक्षरता वाढली आहे आणि स्वतचं आर्थिक भविष्य घडवण्याची संधी निर्माण झाली आहे. आधुनिक गुंतवणुकीमुळे तरुण आर्थिक नियोजन शिकतात. वयाच्या सुरुवातीला गुंतवणूक केल्यास कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो. मात्र त्याच वेळी जोखीम आणि गोंधळदेखील वाढला आहे. युवा गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी पुरेशी माहिती, योग्य सल्ला आणि संयम बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. डे ट्रेडिंग, क्रिप्टो करन्सी किंवा डेरिव्हेटिव्हसारख्या साधनांमध्ये प्रचंड जोखीम असते. सोशल मीडियावर अनेक ‘गुरू’ चुकीच्या टिप्स देतात. तरुण त्यांच्या नादी लागून नुकसान करतात. सेबीने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात डेरिवेटीव ट्रेडिंगमध्ये 91 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांनी सुमारे 1.05 लाख कोटी घालवले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 41 टक्के जास्त आहे.

शेअर बाजार किंवा कुठलीही गुंतवणूक झटपट श्रीमंत बनवत नाही. अभ्यास, संयम, शिस्त आणि दीर्घकालीन दृष्टिकोन असलेल्यांनाच उत्तम परतावा मिळतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन नव्या पिढीने बाजारात शिरकाव करावा, पण समजूतदारपणा आणि शहाणपणासह. तरच आर्थिक स्वावलंबनाचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

नवीन पिआकर्षण का वाटते?

तंत्रज्ञान सुलभता :  पूर्वी शेअर्स खरेदी-विक्रीसाठी दलालावर अवलंबून राहावं लागायचं. आता स्मार्टफोनवर अॅप उघडून नेट बँकिंग किंवा वॉलेटद्वारे काही सेकंदात व्यवहार करता येतो. हे खूप सोपं, वेळ वचवणारं आणि सोयीचं वाटतं.

लहान भांडवल: आधी मोठय़ा भांडवलाशिवाय शेअर बाजारात शिरकाव करता येत नसे. आज केवळ 500 रुपयांत एसआयपी किंवा एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करता येते तर आयपीओसाठी केवळ 15000 रुपये पुरतात.

जलद नफा मिळवण्याची अपेक्षा : तरुवेग हवा असतो. क्रिप्टो, फॉरेक्स ट्रेडिंग किंवा शेअर बाजारातील ट्रेडिंग, डेरिवेटीव, आयपीओ अशा मार्गांनी जलद नफा मिळू शकतो. हा नफा पारंपरिक गुंतवणुकीपेक्षा खूपच जास्त आहे. यात जोखीम असली तरीही तरुणांना तेच थ्रिल वाटतं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांची संख्याही वाआहे.

[email protected]
(लेखक गुंतवणूक तज्ञ आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नॉनव्हेज प्रेमींनो सावधान! जास्त चिकन खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार नॉनव्हेज प्रेमींनो सावधान! जास्त चिकन खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार
जगभरात मोठ्या प्रमाणात लोक चिकन खाण्याचे शौकीन आहेत. चविष्ट आणि पौष्टिक असल्यामुळे ते नॉन – व्हेज प्रेमींच्या थाळीतील एक आवडता...
पावसाळ्यात नाकही आजारी पडते! जाणून घ्या 5 सामान्य समस्या आणि त्यावरील उपाय
Ratnagiri News – उदय सामंतानी एमआयडीसी विरोधकांचे पुरावे जाहीर करावे, संघर्ष समितीप्रमुखाचे आव्हान
Nagar News – जिल्हा नियोजन निधीत गैरव्यवहार? अजित पवार यांचे चौकशीचे आदेश
IND vs ENG 4th Test – सर डॉन ब्रॅडमन यांना जमलं नाही ते शुभमन गिलने करून दाखवलं, 148 वर्षांच्या इतिहासातील विक्रम
मुंबई-वाराणसी इंडिगो विमान दोन तास धावपट्टीवरच, प्रवाशांमध्ये संताप
जन सुरक्षा कायद्याची भीती नाही ती राबवणाऱ्यांची भीती; निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचे परखड मत