पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी पुणे पोलिसांची माहिती, अवघ्या दोन मिनिटात पत्रकार परिषद आटोपली
पुण्यातील खराडी या हायप्रोफाईल परिसरात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास छापेमारी केली. या छापेमारीत दोन महिलांसह पाच पुरुषांना अटक करण्यात आले आहे. या रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा देखील समावेश होता. छापेमारीत दारु, ड्रग्ज आणि हुक्का जप्त करण्यात आला आहे. या कारवाईबाबत माहिती देण्यासाठी पुणे पोलिसांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र अवघ्या दोन मिनिटांत माहिती देत पोलिसांनी ही पत्रकार परिषद आटोपती घेतल्याचे दिसून आले.
आमच्या दृष्टीकोनातून एक ड्रग पार्टी इथे चालू होती. अधिक तपास आम्ही करत आहोत. त्याची व्याख्या काय असावी का नसावी यावर आपण नंतर भाष्य करु शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच पुणे शहर यांनी ही कारवाई केली. रेव्ह पार्टीसंदर्भात पुढील कारवाई सुरू आहे. छापेमारीत ताब्यात घेतलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींची प्रीअरेस्ट वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे. अहवाल आल्यानंतर पुढील बाबी उघड होतील. तपास पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती देऊ, असे सांगत पोलिसांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List