राज यांच्या भेटीमुळे आनंद अनेक पटींनी वाढला आहे; उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 65 वा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातून शिवसैनिक त्यांच्या भेटीला आले आहेत. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या भेटीमुळे अनेक पटींनी आनंद वाढल्याचे सांगितले आहे.
राज ठाकरे यांच्या भेटीने आणि शुभेच्छांनी आनंद द्विगुणीत नव्हे, तर शतगुणीत झाला आहे. आनंद अनेक पटींनी वाढल्याने यापुढील काळही आनंदाचा आणि चांगलाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अनेक वर्षांनी आम्ही भाऊ भेटलो, त्यात काय अयोग्य आहे. आम्ही जेथे वाढलो, तेथे आम्ही भेटलो. ज्यांनी आम्हाला वाढवले त्यांच्या खोलीत जात आम्ही नतमस्तक झालो. त्यामुळे याच चर्चेसारखे काहीही नाही. राज यांच्या भेटीने आपला आनंद अनेक पटींनी वाढला आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांना मनापासून धन्यवाद करत त्यांचे आभारही त्यांनी मानले आहेत. आपल्याला अशा शुभेच्छा नेहमी मिळतात आणि तीच खरी शक्ती असल्याचेही त्यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List