दररोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी पिण्यास करा सुरुवात, आरोग्याच्या ‘या’ समस्यापासून मिळेल आराम

दररोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी पिण्यास करा सुरुवात, आरोग्याच्या ‘या’ समस्यापासून मिळेल आराम

अंजीर हे एक असे फळ आहे जे ताजे आणि सुकवलेले अंजीर असे दोन्ही प्रकारे खाल्ले जाते. तर या अंजीरमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात, जे आपल्या आरोग्यास अधिक फायदे प्रदान करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की अंजीरचे पाणी आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. हो, जर सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायले तर ते खूप आरोग्यदायी फायदे देऊ शकते. चला जाणून घेऊया अंजीरचे पाणी पिण्याचे काय फायदे आहेत.

वजन कमी करण्यास उपयुक्त

अंजीरचे पाणी चयापचय वाढवते आणि शरीरात जमा झालेली अतिरिक्त फॅट कमी करण्यास मदत करते. अंजीरच्या पाण्यात असलेले फायबर भूकेवर नियंत्रण ठेवते, ज्यामुळे जास्त खाण्याची सवय कमी होते.

पचनसंस्था मजबूत करते

अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते . रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लपित्त या समस्या दूर होतात. तसेच आतडे देखील स्वच्छ करते आणि आतड्यांची हालचाल सुलभ करते.

तुमची हाडे मजबूत होतात

अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात, जी हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक असतात. यासाठी अंजीरचे पाणी नियमितपणे प्यायल्याने ऑस्टियोपोरोसिस आणि सांधेदुखी टाळता येते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

अंजीरमध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय कोलेस्टेरॉल कमी करून हृदयरोगाचा धोका देखील कमी करते.

मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त

अंजीरचे पाणी रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवते, कारण त्यात असलेले फायबर ग्लुकोजचे शोषण कमी करते. मात्र हे पाणी पिण्याआधी मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते प्यावे.

अशक्तपणा प्रतिबंध

अंजीरमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, जे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. रिकाम्या पोटी त्याचे पाणी प्यायल्याने अशक्तपणाची समस्या दूर होते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे त्वचा चमकदार होते आणि मुरुमे कमी होतात. तसेच केस गळती थांबवते आणि त्यांना मजबूत बनवते. यासाठी दररोज रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी प्या.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

अंजीरच्या पाण्यात व्हिटॅमिन सी आणि इतर दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. त्यामुळे अंजीरच्या पाण्याच्या सेवनाने सर्दी आणि संसर्गापासून बचाव करते.

अंजीरचे पाणी कसे बनवायचे?

2-3 सुके अंजीर रात्रभर 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा.

सकाळी अंजीर कुस्करून घ्या आणि पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.

हे पाणी हळूहळू प्या आणि अंजीर चावून खा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

श्रावणात मासांहार न करण्याची शास्त्रीय कारणे जाणून घ्या श्रावणात मासांहार न करण्याची शास्त्रीय कारणे जाणून घ्या
आपल्या हिंदु धर्मामध्ये श्रावण महिन्याचं महत्त्व हे खूप खास आहे. श्रावण महिना या व्रत वैकल्यांचा महिना म्हणूनच ओळखला जातो. श्रावणामध्ये...
कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या हा सरकारने केलेला सदोष मनुष्य वध, संजय राऊत यांचा घणाघात
तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? मराठी खासदारांनी निशिकांत दुबेंना संसदेत घेरलं; टप्प्यात येताच कार्यक्रम
एकतर्फी प्रेमातून विकृताचे भयंकर कृत्य; महिलेच्या पतीची हत्या करून मृतदेह चिखलात गाडला, वाशी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या अवळल्या
ठाण्यात स्कूलबसमध्ये मेंढरासारखी कोंबाकोंबी, सीएनजीच्या बाटल्यावर बैठक; विद्यार्थी गॅसवर, आरटीओचा 48 जणांवर कारवाईचा बडगा
शहापुरात ‘चिखल’ पूर, गर्भवतीची झोळीतून एक किलोमीटर फरफट
पंढरपूर कॉरिडॉर लपूनछपून करणार नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस