नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट (हिंद स्वराज्य संघ) यांच्यावतीने हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पुणे येथे 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या 105 व्या पुण्यतिथीनिमित्त टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या विशेष सोहळ्यात हा पुरस्कार नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात येईल. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, हा पुरस्कार 1983 पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे. देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यंदा गडकरी 43 वे प्राप्तकर्ता ठरले आहेत. या पुरस्कारात 1 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्रक यांचा समावेश आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रणब मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List