ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानी विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला, उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल
ऑस्ट्रेलियामध्ये एका हिंदुस्थानी विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पाच जणांनी मिळून 23 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील काही महिन्यांमध्ये जगातील विविध देशांमध्ये हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
द ऑस्ट्रेलिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, चरणप्रीत सिंह असे 23 वर्षीय पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. 19 जुलै रोजी लाईट शो पाहण्यासाठी चरणप्रीत पत्नीसह आला होता. याच दरम्यान साधारण 9 ते साडेनऊच्या दरम्यान किंटोर एव्हेन्यू येथे त्याच्यावर पाच जणांनी हल्ला केला. पती-पत्नी गाडीपाशी उभे होते याच वेळी पाच जण आले आणि त्यांनी चरणप्रीत सिंहवर हल्ला केला. अश्लील शब्दप्रयोग आणि वर्णभेदी टिप्पणी करत धारधार हत्याराने त्याच्यावर वार केला. चरणप्रीतने स्वत:ला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पंरतु हल्लेखोरांनी लाथाबुक्यांनी त्याला मारहाण केली. या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून उर्वरित चौघांचा शोध सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List