पुण्याच्या श्रेयसी जोशीने रचला इतिहास!
पुण्याच्या श्रेयसी जोशी हिने दक्षिण कोरियामध्ये सुरू असलेल्या आशियाई रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत इतिहास रचलाय. तिने इनलाइन फ्री स्टाईल-क्लासिक स्लॅम प्रकारात हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम केला. या प्रकारात आशियाई पातळीवर सुवर्णपदक जिंकणारी श्रेयसी ही हिंदुस्थानची पहिलीच खेळाडू ठरली आहे, हे विशेष. आशियातील सर्वोत्तम स्केटर्सच्या स्पर्धेत श्रेयसीने आत्मविश्वासपूर्ण आणि नेत्रदीपक रचनांचे सादरीकरण करत पंचांची मने जिंकली. तिच्या या सोनेरी कामगिरीमुळे पुण्यासह देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. तीन वर्षांची असताना श्रेयसीने स्केटिंगला सुरुवात केली. तिची बहीण स्वराली हीदेखील एक कुशल स्केटर असून, तिच्या नावावर नऊहून अधिक राष्ट्रीय किताब आहेत. दोघींनाही सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा राष्ट्रीय पदक मिळाले होते आणि त्यानंतर त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List