मुंबईत घरांची कोटींची उड्डाणे; 40 कोटींहून अधिक किमतीच्या घरांना पसंती, वरळी व वांद्रे टॉपवर, विक्री तीनपटींनी वाढली
परवडणारी घरे मिळत नाहीत म्हणून अनेक मुंबईकर उपनगरात स्थलांतरित झाले असताना दुसरीकडे मुंबईत 40 कोटींहून अधिक किमतीच्या आलिशान घरांना पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. या घरांची विक्री तब्बल तीनपटींनी अधिक वाढली असून वरळी आणि वांद्रे टॉपवर असल्याचे समोर आले आहे.
2025 च्या पहिल्या सहा महिन्यांत 40 कोटींहून अधिक किमतीच्या घरांची विक्री सर्वाधिक झाली. 2022 मध्ये विक्रीचा आकडा 17 युनिट्सने वाढला, तर 2024 मध्ये हाच आकडा 53 युनिट्सने वाढला म्हणजेच तब्बल 138 टक्क्यांनी वाढला. इंडिया सोथबीज इंटरनॅशनल रियल्टीच्या नव्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. सध्याच्या घडीला मुंबईत 10 कोटींहून अधिक किमतीच्या घरांची 14,750 कोटी रुपयांमध्ये विक्री झाली. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत याच घरांची किंमत 12,300 कोटी रुपये होती.
कुठे किती विक्री?
वांद्रे पश्चिममध्ये घरांच्या विक्रीत तब्बल 192 टक्क्यांची वाढ झाली. ताडदेवमध्ये 254 टक्के, प्रभादेवी आणि मलबार हिल येथेही कोटय़वधी रुपयांच्या घरांची मोठय़ा प्रमाणावर विक्री झाली. यादरम्यान 2 हजार ते 4 हजार चौरस फूटच्या अपार्टमेंट्सला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसले. या घरांची प्रायमरी विक्री 70 टक्के इतकी झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List