ईडीचे अघोरी कारनामे, संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक सरन्यायाधीश गवई यांना पाठवलं
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना त्यांचे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक भेट म्हणून पाठवले आहे. यासोबतच त्यांनी एक पत्र लिहून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) राजकीय दुरुपयोगावर भाष्य केले आहे. याबाबत X वर पोस्ट करत संजय राऊत म्हणाले आहेत की, “भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना नरकातला स्वर्गची प्रत पाठवली. न्या.गवई यांनी ईडीचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. महाराष्ट्रातील घटनांचा संदर्भ न्या.गवई यांनी दिला. ईडीचे अघोरी उद्योग कसे असतात तेच नरकातला स्वर्ग मध्ये मी सांगितले आहे.”
पुस्तकासोबत संजय राऊत यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना एक पत्र ही पाठवलं आहे. या पत्रात ते म्हणाले आहेत की, “ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा मनमानी पद्धतीने व सूडबुद्धीने काम करीत आहेत. त्यात अनेकजण नाहक बळी गेले. ‘ईडी’ने राजकीय हत्यार म्हणून स्वतःचा वापर होऊ देऊ नये असे कडक निरीक्षण आपण अलीकडेच नोंदवले. याबाबत आपण महाराष्ट्रातील घडामोडींचा संदर्भ दिलात त्याबद्दल देशभरातील लोकशाहीप्रेमी जनता आपली आभारी राहील.”
पत्रात संजय राऊत पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रात ‘ईडी’च्या माध्यमातून जी राजकीय सुडाची प्रकरणे घडविण्यात आली त्याचा मी स्वतः एक बळी आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांनाही सूडचक्राच्या दमन चक्रातून जावे लागले. मी स्वतः शंभर दिवसांपेक्षा जास्त तुरुंगात राहिलो व ईडीचा छळ सहन केला. ‘ईडी’चे अघोरी कारनामे व तुरुंगातील अनुभवावर ‘नरकातला स्वर्ग’ हे माझे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. पुस्तकाची प्रत आपल्या अवलोकनार्थ पाठवीत आहे.”
भारताचे सरन्यायाधीश श्री.भूषण गवई यांना नरकातला स्वर्ग ची प्रत पाठवली. न्या.गवई यांनी इ डी चा राजकीय हत्यार म्हणून वापर होत असल्याचे निरीक्षण नोंदवले.
महाराष्ट्रातील घटनांचा संदर्भ न्या.गवई यांनी दिला.
इ डी चे अघोरी उद्योग कसे असतात तेच नरकातला स्वर्ग मध्ये मी सांगितले आहे. pic.twitter.com/xkW3Dabw00— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List