वाटद एमआयडीसी का नको? पोलीस अधीक्षकांसमोर ग्रामस्थांनी मांडली भूमिका
हे आमचं शेत, या आमच्या बागायती आणि हे धबधबे पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना वाडीवस्तीवर फिरवत एमआयडीसी विरोधकांनी दाखवल.तसेच वाटद एमआयडीला का विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट करत भूमिका मांडली. आमचं चांगलं आयुष्य चाललं आहे.आम्हाला म्हणून एमआयडीसी नको अशी ग्रामस्थांची भूमिका मांडण्याऱ्या प्रथमेश गवाणकर यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज प्रस्तावित वाटद एमआयडीसी परिसराला भेट देत पहाणी केली. त्यानंतर जयगड पोलीस ठाण्यात ग्रामस्थांशी संवाद साधला.
वाटद एमआयडीसी विरोधात काही दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी जनसंवाद सभा घेत मोर्चा काढला होता. या घटनेनंतर बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत जयगड पोलीस ठाण्यात संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर,जयगडचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील हे उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आमच्या सोबत गावात फिरले. त्यांनी शेती,बागायती आणि धबधबे पाहिले.पहिला आयपीएस अधिकारी ज्यांनी गावात येऊन आमच्याशी संवाद साधत प्रत्यक्ष पहाणी केली.
– प्रथमेश गवाणकर, आंदोलक
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List