वेगावर स्वार होऊन भेदक मारा करणारी क्रांती गौड आहे तरी कोण? तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा अर्धा संघ धाडला होता तंबूत
हिंदुस्थान आणि इंग्लंड महिला संघांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका पार पाडली. या मालिकेतील शेवटचा सामना 22 जुलै 2025 रोजी चेस्टर ली स्ट्रीटमध्ये खेळला गेला. या सामन्यात हिंदुस्थानच्या मुलींनी बाजी मारत इंग्लंडचा 13 धावांनी पराभव केला. तसेच टीम इंडियाने मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर (102) व्यतिरिक्त उल्लेखनिय कामगिरी करून जगभरातील क्रीडा प्रेमींच लक्ष वेधून घेतलं ते 21 वर्षीय क्रांती गौडने. तिने 9.5 षटकांची गोलंदाजी करत 52 धावा दिल्या आणि इंग्लंडचे सहा खेळाडू तंबूत धाडले. क्रांती गौडच्या भेदक माऱ्यामुळे टीम इंडियाचा 13 धावांनी विजय झाला आणि इंग्लंडचा संपूर्ण संघ 305 धावांवर बाद झाला.
कोण आहे क्रांती गौड?
क्रांती गौड मध्य प्रदेशातील छिंदवाडा या गावातील मुळ रहिवासी आहे. 11 ऑगस्ट 2003 साली तिचा जन्म झाला असून तिला लहानपणापासून खेळण्याची प्रचंड आवड होती. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून क्रांतीने मैदानावर आपलं पहिल पाऊल टाकलं. त्यानंतर तिला मध्यप्रदेशच्या ज्युनिअर संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. खऱ्या अर्थाने या नंतर क्रांतीच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. तिने आपल्या खेळाची झलक वेळोवेळी दाखवून दिली. त्यामुळे तिची मध्यप्रदेशच्या 23 वर्षांखालील संघात निवड झाली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर तिला WPL मध्ये युपी वॉरियर्स संघाने आपल्या ताफ्यात सामिल करून घेतलं. WPL मध्येही तिने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं. WPL मध्ये केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे टीम इंडियाच्या मुख्य संघात तिला स्थान मिळालं. क्रांती गौडने टीम इंडियाकडून खेळताना आतापर्यंत चार वनडे आणि एक टी-20 सामना खेळला आहे. तिने वनडेमध्ये 17.55 च्या सरासरीने 9 विकेट घेतल्या आहेत.
बीसीसीआय आता राष्ट्रीय क्रीडा विधेयकाच्या कक्षेत येणार! संसदेत आज मांडले जाणार विधेयक
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List