ऐन अधिवेशनात मोदी फ्लाईट मोडवर, स्वारी लंडनला उडाली; मालदीवलाही जाणार
पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर यासह देशातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधक करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फ्लाईट मोड’वर गेले आहेत. ब्रिटन व मालदीवच्या चार दिवसीय दौऱयासाठी ते आज रवाना झाले.
नरेंद्र मोदी यांचा ब्रिटन दौरा दोन दिवसांचा आहे. त्या दरम्यान ते ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासह किंग चार्ल्स तिसरे यांचीही भेट घेणार आहेत. तर मोहम्मद मिझ्झू यांच्या निमंत्रणावरून मोदी मालदीवचा दौरा करणार आहेत. मालदीवच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. व्यापारी व संरक्षणविषयक सहकार्य वाढवण्याचा दौऱयाचा उद्देश आहे.
सरकार खूश… चिन्यांना व्हिसा देणार
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या चीन दौऱयानंतर हिंदुस्थान सरकार चीनवर खूष झाले आहे. हिंदुस्थानने चिनी पर्यटकांना व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 24 जुलैपासून चिनी नागरिक टुरिस्ट व्हिसासाठी अर्ज करू शकणार आहेत. कोविड काळात हिंदुस्थानने चिनी पर्यटकांना व्हिसा बंद केला होता. गलवान खोऱयातील संघर्षांनंतर दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले. त्यामुळे हा व्हिसा बंदच राहिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List