एअर इंडियाने 12 चुकीचे मृतदेह पीडित ब्रिटिश कुटुंबांना दिले; तपासात झाले उघड

एअर इंडियाने 12 चुकीचे मृतदेह पीडित ब्रिटिश कुटुंबांना दिले; तपासात झाले उघड

अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह अद्याप त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचलेले नाहीत. पाठवलेल्या मृतदेहांपैकी 12 मृतदेहांचे अवशेष हे बदललेले पाठवण्यात आले आहेत. लंडनमधील मृत  कुटुंबियांचे काम पाहणाऱ्या वकिलांनी हे उघड केले आहे. त्यांचा दावा आहे की, लंडनमध्ये हे मृतदेह तपासण्यात आले तेव्हा ते दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे आढळून आले. आतापर्यंत या प्रकरणात एअर इंडियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, यामध्ये क्रू मेंबर्स आणि इतरांसह 269 लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 52 ब्रिटिश नागरिकांचा समावेश होता. हा अपघात इतका भयानक होता की, मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते. त्यानंतर डीएनए चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर ते मृतांच्या कुटुंबियांना पाठवण्यात आले.

लंडनमध्ये या मृतदेहांची पुन्हा तपासणी करण्यात आली. तपास अधिकारी कोरोनरने डीएनए मॅच केल्यावर ते मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे निष्पन्न झाले. एक-दोन नव्हे तर 12 मृतदेहांसोबत हे घडले. मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे तपासात उघड झाल्यानंतर अनेक कुटुंबांना त्यांचे अंत्यसंस्कार रद्द करावे लागले.

वकील जेम्स हीली प्रॅट यांनी डेली मेलला सांगितले की, किमान 12 ब्रिटिश नागरिकांचे अवशेष परत हिंदुस्थानामध्ये  पाठवण्यात आले आहेत. ते म्हणाले की, मी एका महिन्यापासून या ब्रिटिश कुटुंबांच्या घरी बसलो आहे, या लोकांना फक्त त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह परत हवे आहेत. यापैकी अनेकांना अद्याप त्यांच्या प्रियजनांचे अवशेष देखील मिळालेले नाहीत. काही लोकांना मृतदेह मिळाले आहेत पण ते त्यांच्या प्रियजनांचे नाहीत. जेम्स म्हणाले की, हा एक मोठा निष्काळजीपणा आहे, याचे स्पष्टीकरण कुटुंबियांना मिळायलाच हवे.

एअर इंडिया विमान अपघात इतका भयानक होता की मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते. तज्ञांच्या मते, इमारतीला धडकल्यानंतर विमान आगीचा गोळा बनले ज्याचे तापमान 1500 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. यामुळे मृतदेह पूर्णपणे जळाले होते. नंतर त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह सर्व कुटुंबांना सोपवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली. अनेक कुटुंबांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्लास्टिकच्या डब्यात त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह आढळले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमच्या पोटाचं आरोग्य राहिल निरोगी जाणून घ्या फायदे नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमच्या पोटाचं आरोग्य राहिल निरोगी जाणून घ्या फायदे
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. आरोग्यावर दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर परिणाम होऊ...
दररोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी पिण्यास करा सुरुवात, आरोग्याच्या ‘या’ समस्यापासून मिळेल आराम
‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा तुम्ही गरजेपेक्षा खाताय जास्त मीठ, ताबोडतोब प्रमाण करा कमी
दुधाच्या पिशव्यांपासून बनवा कंपोस्ट, प्रोसेस जाणून घ्या
हिंदुस्थान 5 वर्षांनी पुन्हा चिनी पर्यटकांना देणार व्हिसा देणार, 24 जुलैपासून करता येईल अर्ज
इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या हत्येचा कट, 70 वर्षीय महिलेला अटक
IND vs ENG 4th Test – ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत, टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता