ठाण्यात स्कूलबसमध्ये मेंढरासारखी कोंबाकोंबी, सीएनजीच्या बाटल्यावर बैठक; विद्यार्थी गॅसवर, आरटीओचा 48 जणांवर कारवाईचा बडगा

ठाण्यात स्कूलबसमध्ये मेंढरासारखी कोंबाकोंबी, सीएनजीच्या बाटल्यावर बैठक; विद्यार्थी गॅसवर, आरटीओचा 48 जणांवर कारवाईचा बडगा

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ठाणे शहरातील अनेक स्कूल व्हॅन आणि बसेस बेकायदा चालवल्या जात आहेत. त्यांच्याकडून नियमांचे कोणतेही पालन होत नाही. व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांना मेंढरांप्रमाणे कोंबले जात असून बसण्यास जागा नसल्याने थेट सीएनजीच्या बाटल्यावर बसवले जात आहे. अशा बेशिस्त 47 स्कूल व्हॅन आणि बसेसवर ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने धडक कारवाई केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन आणि बसचालकांचे दाबे दणाणले आहेत.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन आणि बसेससाठी परिवहन विभागाने काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. त्याचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना संबंधित वाहतूकदारांना नेहमीच दिल्या जात असल्या तरी अनेक व्हॅन आणि बसचालक याकडे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्त मोहीम राबवली. त्यांनी सहा दिवसांत २०२ स्कूल व्हॅन आणि बसेसची तपासणी केली. त्यापैकी ४७ व्हॅन आणि बसेस या विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करताना आढळून आल्या. या वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना मेंढरांप्रमाणे कोंबून भरले होते. काही विद्यार्थी तर जागा नसल्यामुळे थेट सीएनजीच्या बाटल्यावर बसले होते. या सर्वच वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्याल याने कारवाई केली आहे.

प्रथमोपचार पेटी, जीपीएस यंत्रणा नाही

शालेय वाहनांमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेसाठी प्रथमोपचार पेटी, जीपीएस यंत्रणा, अग्निशमन यंत्र, योग्य आसन व्यवस्था, अधिकृत चालक-वाहक आणि फिटनेस प्रमाणपत्र यांसारख्या बाबी अनिवार्य आहेत. मात्र तपासणीत कारवाई करण्यात आलेल्या यापैकी बहुतेक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले. काही वाहनांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरशः कोंबून घातले जात असल्याचे निदर्शनास आले. कागदपत्रांची पूर्तता, विमा, कर, फिटनेस प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आढळून आली नाहीत.

नुकत्याच घडलेल्या काही दुर्घटनांमुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, कोपरी, घोडबंदर, माजिवडा आणि कळवा परिसरात विशेष पथकाने सकाळच्या वेळेत तपासणी मोहीम सुरू ठेवली आहे. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार आहे, असे प्रादेशिक परिवहनच्या सूत्रांनी सांगितले.

सुरक्षेबाबत तडजोड नाही

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बेकायदेशीरपणे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जात आहे आणि ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. स्कूल व्हॅन चालकांनी जे नियम घालून दिले आहेत त्याचे तंतोतंत पालन करावे. वाहनाची आसनक्षमता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची वाहतूक करावी. वाहतुकीच्या नियमांचा भंग करू नये. जर बेकायदा वाहतूक करताना वाहन आढळून आले तर कडक करवाई करण्यात येणार आहे, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हाडात जमलेले युरिक एसिड असे बाहेर काढा, हे 4 उपाय नक्की आजमावा हाडात जमलेले युरिक एसिड असे बाहेर काढा, हे 4 उपाय नक्की आजमावा
आजकाल चुकीचा आहार आणि वाईट लाईफस्टाईलने युरिक एसिडच्या समस्या वेगाने वाढत आहे. वाढत्या वयानुसार युरिक एसिडची समस्या सर्वसामान्य मानली जाते....
कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल; वादग्रस्त मंत्री, आमदारांवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवार, मिंध्यांचे कान टोचले!
माघी गणपतीच्या विसर्जनाला परवानगी द्या, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी
Thailand-Cambodia Conflict – थायलंडकडून 8 सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मार्शल लॉ लागू, कंबोडियाविरुद्धचे युद्ध भडकले
Nagar News – महाराष्ट्राची वाटलाच अधोगतीकडे, बाळासाहेब थोरात यांची राज्य सरकारवर टीका
Nagar News – किरण काळे यांना न्यायालयीन कोठडी
महायुती सरकारने शिवभोजन थाळी विकणाऱ्यांवरच आणली उपासमारीची वेळ, 3 महिन्याचे अनुदान थकवले