कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या हा सरकारने केलेला सदोष मनुष्य वध, संजय राऊत यांचा घणाघात
सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारने जलजीवन मिशन योजनांच्या कामांचे पैसे न दिल्याने निराश होऊन कंत्राटदार हर्षल पाटील यांनी सांगलीतील आपल्या गावी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेवरून संताप व्यक्त केला जात असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी एक्स (आधीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी हर्षल पाटील यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. तसेच उच्च न्यायालयाने सुमोटो दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.
कर्जबाजारी कंत्राटदाराची गळफास घेऊन आत्महत्या, महायुती सरकारने जलजीवन मिशनचे दीड कोटी थकवले
“सरकार अमानुष निर्दय आहे. स्वतःच्या मोठेपणाचे ढोल वाजवण्यासाठी भाडोत्री भाट ठेवले आहेत. हर्षल पाटीलची आत्महत्या ही मराठी तरुणांची अगतिकता आहे. सरकारने केलेला हा सदोष मनुष्य वध आहे. हा कोर्टाने सुमोटो दखल घेऊन खालील तिघांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला हवा. जय महाराष्ट्र!”, अशी पोस्ट संजय राऊत यांनी शेअर केली. या पोस्टसोबत एक फोटोही शेअर करण्यात आला आहे. यावर फडणवीस, शिंदे, अजित पवार यांचा फोटो असून हर्षल पाटील ही आत्महत्यू नसून सरकारने केलेली हत्याच आहे, असे लिहिलेले आहे.
सरकार अमानुष निर्दय आहे,
स्वतःच्या मोठेपणाचे ढोल वाजवण्यासाठी भाडोत्री भाट ठेवले आहेत
हर्षल पाटील ची आत्महत्यां ही मराठी तरुणांची अगतिकता आहे.
सरकारने केलेला हा सदोष मनुष्य वध आहे
हाय कोर्टाने स्यू मोटो दखल घेऊन खालील तिघांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला हवा
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/Qw3ZjRm3M5— Sanjay Raut (@rautsanjay61) July 24, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List