इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या हत्येचा कट, 70 वर्षीय महिलेला अटक
इस्त्रायलच्या सुरक्षा यंत्रणेने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या हत्येच्या कटाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी शिन बेट या सुरक्षा यंत्रणेने बुधवारी तेल अवीव येथील एका 70 वर्षीय महिलेला अटक केली आहे. ही महिला सरकारविरोधी आंदोलनाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. तिच्यावर स्फोटक उपकरण (IED) वापरून नेतन्याहू यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखल्याचा आरोप आहे.
शिन बेट आणि इस्त्रायल पोलिसांच्या राष्ट्रीय गंभीर आणि आंतरराष्ट्रीय गुन्हे तपास युनिटने या प्रकरणाचा तपास केला. दोन आठवड्यांपूर्वी या महिलेला अटक करण्यात आली होती आणि तिची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता हे प्रकरण राज्य सरकारी वकिलांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे. गुरुवारी याप्रकरणी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने नेतन्याहू यांच्या हत्येची योजना आखली होती. तिने इतर आंदोलकांशी संपर्क साधून शस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न केला आणि नेतन्याहू यांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या महिलेला अटक करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List