गुजरातमध्ये चार दहशतवाद्यांना अटक, हल्ल्याचा कट उधळला…, अल कायदा कनेक्शन उघड
गुजरात दहशतवादविरोधी पथकाने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटशी संबंधित धोकादायक मॉडय़ूलचा गुजरात एटीएसने पर्दाफाश केला असून चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमधून ही अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
सैफुल्लाह कुरेशी, मोहमद फर्दीन, मोहम्मद पैफ आणि झिशान अली अशी या चार संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी 20 ते 25 वयोगटातील आहेत. हिंदुस्थानात विविध ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्याचा कट हे दहशतवादी आखत असल्याची माहिती मिळाली होती, असे एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून संपका&त
या दहशतवाद्यांना काही विशेष आणि संवेदनशील ठिकाणांना टार्गेट करण्याचे निर्देश मिळाले होते. चारही संशयित दहशतवादी सोशल मीडिया अॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. सीमेपलीकडील दहशवाद्यांशीही त्यांचा संपर्क होता अशी माहितीही समोर आली आहे. दरम्यान, गुजरात एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणा या मॉडय़ूलचे नेटवर्क, फंडिंग, ट्रेनिंग आणि विदेशी संपर्क असे जाळे शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List