मोठं लफडं झालंय वाटतं! धनखडांना निवासस्थान ताबडतोब सोडण्याचे आदेश

मोठं लफडं झालंय वाटतं! धनखडांना निवासस्थान ताबडतोब सोडण्याचे आदेश

उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देणारे जगदीप धनखड यांना सरकारी निवासस्थान ताबडतोब सोडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. ज्या वेगाने धनखड यांना हे आदेश देण्यात आले आहेत, ते पाहता केंद्र सरकार व धनखड यांच्यात काहीतरी मोठे लफडे झाले असावे, अशी चर्चा आहे.

जगदीप धनखड यांनी सोमवारी रात्री प्रकृतीचे कारण देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला, मात्र दिवसभर कामकाजात उत्साहाने भाग घेणाऱया धनखड यांच्या राजीनाम्याचे कारण कुणालाही पटले नाही. धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत आणण्याइतपत काहीतरी केले असल्याचीही एक चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे. या चर्चेला आजच्या सरकारी आदेशाने एकप्रकारे बळ मिळाले. नव्या संसद भवनाच्या बाजूलाच नवे उपराष्ट्रपती भवन बांधण्यात आले आहे. तेथे धनखड यांचे वास्तव्य होते. हे निवासस्थान तातडीने खाली करा, असे त्यांना बजावण्यात आले.

पर्यायी सरकारी निवासस्थान मिळणार का?

प्रोटोकॉलनुसार उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना टाइप-8 श्रेणीतील सरकारी बंगला दिला जातो. धनखड यांचा कार्यकाळ 2027 साली पूर्ण होणार होता. त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे सरकार त्यांना बंगला देणार की नाही हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ओढणी उडाली आणि खुनी पत्नी जाळ्यात सापडली, प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या ओढणी उडाली आणि खुनी पत्नी जाळ्यात सापडली, प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
तोंडावर ओढणी बांधून ती पुण्याच्या मेडिकल स्टोअरमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. जोराचा वारा आल्याने ओढणी उडाली आणि दबा...
ठाण्यातील जुना कोपरी पूल आठ दिवस बंद, 26 जुलै ते 3 ऑगस्ट मिशन गर्डर लाँचिंग; वाहतूककोंडीचा कोपरीकरांना होणार हेडॅक
तुर्कीचा धडका, खरेदी करणार 40 युरोफायटर
ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले! मार्लेश्वर तिठा येथे खासगी कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांचा संताप
Shravan Special – उपवासाचा साधा सोपा पौष्टिक पराठा
पाकिस्तानी पासपोर्टचा नंबर शेवटून चौथा
अखेर तीन वर्षांचा जीएसटी माफ, कर्नाटक सरकारचा निर्णय