बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या
तृणमूल काँग्रेसने सोमवारी पश्चिम बंगालमध्ये ‘शहीद दिवस’ रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ते लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जीपर्यंत सर्वांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाषेवरून सुरू असलेल्या वादात ममता बॅनर्जी यांनी बंगाली भाषेचा अपमान आणि विरोधाचा मुद्दा उपस्थित केला. यासोबतच बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीच्या पुनरावृत्ती प्रक्रियेबाबतही त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
भाषेवरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आम्हाला हिंदी, मराठी, गुजराती अशा सर्व भाषा आवडतात, पण तुम्ही (भाजप) बंगालीला विरोध का करत आहात? गरज पडली तर पुन्हा भाषा आंदोलन होईल.”
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, केंद्राच्या सत्तेतून भाजपला बाहेर काढेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. भाजप आणि निवडणूक आयोग बंगालविरुद्ध कट रचत आहेत आणि बंगालींना मतदार यादीतून काढून टाकू इच्छितात, असा आरोप त्यांनी केला. भाजपशासित राज्यांमध्ये बंगालींना त्रास दिला जात आहे आणि त्यांना डिटेंशन कॅम्पमध्ये ठेवले जात आहे, असेही त्या म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List