सावकाराच्या त्रासाला कंटाळून कपडा व्यापार्‍याने जीवन संपवलं, आरोपी सावकार भाजपचा पदाधिकारी

सावकाराच्या त्रासाला कंटाळून कपडा व्यापार्‍याने जीवन संपवलं, आरोपी सावकार भाजपचा पदाधिकारी

भाजप पदाधिकारी डॉ.लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी यांच्या सावकारकीतून झालेल्या त्रासाला कंटाळून 42 वर्षीय कपडा व्यापार्‍याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे.

राम दिलीप फटाले (42, रा.काळा हनुमान ठाणा, बीड) असं आत्महत्या केलेल्या व्यापार्‍याचं नाव आहे. राम फटाले हे कपड्याचा व्यापार करत होते. आठवडी बाजारात ते दुकान लावून कपडे विक्री करायचे. कपडा व्यवसायासाठी त्यांनी डॉ.लक्ष्मण जाधव या सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम व्याजासह देऊन देखील जाधव पती-पत्नीकडून मानसिक त्रास देत शिवीगाळ केली जात होती. सावकाराने फटाले यांच्याकडून चेक घेतला होता. पैसे परत देऊनही आणखी पैशाची मागणी करत चेक परत देण्यास नकार दिला जात होता. याबरोबरच त्यांनी काही पतसंस्थांकडून देखील कर्ज घेतलेले होते. कोरोना नंतर कपडा विक्रीत घट झाली. धंदा बसला, खर्च वाढला. त्यामुळे व्याजही वाढत गेले, जानेवारी महिन्यामध्ये सावकाराच्या रक्कमेची परतफेड देखील केली.

शनिवारी रात्री फोनवरून सावकाराने शिवीगाळ केली. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास राम फटाले यांची पत्नी सुलभा झोपेतून उठली. तोपर्यंत राम यांनी पंख्याला दोरी बांधून लटकल्याचे दिसले. त्यांनी मृत्युपूर्वी सावकार डॉ.लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सात पानी चिठ्ठी लिहून ठेवली. डॉ.लक्ष्मण जाधव हा भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास चव्हाण करत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना योनेक्स सनराईज राज्यस्तरीय 15 व 17 वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अग्रमानांकन...
सतेज, राजमाता जिजाऊ संघांना विजेतेपद
बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या
प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि राणा दग्गुबती यांना ईडीने बजावले समन्स; काय आहे प्रकरण?
Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या