मराठीप्रेमींचे आज आझाद मैदानावर धरणे; पाचवीपर्यंत तिसरी भाषा नकोच, नरेंद्र जाधव समिती बरखास्त करा

मराठीप्रेमींचे आज आझाद मैदानावर धरणे; पाचवीपर्यंत तिसरी भाषा नकोच, नरेंद्र जाधव समिती बरखास्त करा

पहिलीपासून हिंदी सक्ती लादणारा शासकीय निर्णय सरकारने तूर्त मागे घेतला असला तरी संकट टळलेले नाही. त्रिभाषा सूत्रासंदर्भात अभ्यास करण्यासाठी सरकारने डॉ. नरेंद्र जाधव समिती नेमली आहे. या भाषिक आणीबाणीविरोधात उद्या मराठीप्रेमी आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत.

शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने हे धरणे आंदोलन आयोजित केले आहे. पाचवीपर्यंत तिसरी भाषा नकोच आणि नरेंद्र जाधव समिती बरखास्त करा अशी या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 दरम्यान त्यासाठी आझाद मैदानात धरणे धरले जाणार आहे. त्यात शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ आणि असंख्य मराठीप्रेमी सहभागी होतील, असे कृती समितीचे अध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले.

समितीच्या अन्य मागण्या

  • बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवा.
  • जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडणारी नवीन संचमान्यता रद्द करा.
  • इंग्रजी भाषा पहिलीऐवजी तिसरीपासून शिकवा.
  • मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांना मोफत शिक्षण देऊन शासकीय नोकरीत प्राधान्य द्या.
  • शासनाकडून प्रसारमाध्यमांशी साधला जाणारा संवाद केवळ मराठी भाषेतून केला जावा. हिंदीतून त्याची पुनरावृत्ती करू नका.
  • हिंदी भाषेच्या वापराबाबत वस्तुस्थिती सांगणारी श्वेतपत्रिका काढा.

अपारदर्शक प्रक्रिया राबवणारे शिक्षणमंत्री दादा भुसे आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांचे तातडीने राजीनामे घ्या, अशी समन्वय समितीची मागणी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;