चयापचयची प्रक्रिया मंद किंवा जास्त झाल्यावर शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
तुम्ही मेटाबॉलिज्म हा शब्द अनेक वेळा ऐकला असेल. तर मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचय यांची प्रक्रिया आपल्या शरीरात योग्य असल्यास तुमचे वजन नियंत्रित करण्यास आणि निरोगी राहण्यास मदत करतात. आपल्यापैकी अनेकांना मेटाबॉलिज्म म्हणजे नेमकं काय आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचय ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये शरीर अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करते. अशातच वय, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि इतर अनेक कारणांमुळे आपल्या शरीरातील चयापचय मंदावू शकतो.
जर तुमच्या शरीरातील चयापचय प्रक्रिया मंदावल्यामुळे बद्धकोष्ठता, वजन वाढणे, त्वचा कोरडी होणे आणि केस गळणे अशी लक्षणे दिसू शकतात. पण असे का होते आणि चयापचय मजबूत करण्यासाठी आहारात काय समाविष्ट केले पाहिजे. चला याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊया.
चयापचय म्हणजे काय?
दिल्लीतील मणिपाल हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग विभागाच्या प्रमुख डॉ. अंकिता बैद्य सांगतात की, चयापचय ही आपल्या शरीरातील एक प्रक्रिया आहे, जी आपल्याला रोजच्या दैनंदिन कामासाठी ऊर्जा प्रदान करते. अशातच जेव्हा एखाद्याच्या शरीरातील चयापचय ही प्रक्रिया मंदावते तेव्हा वजन वाढू शकते. तसेच वयानुसार देखील चयापचय देखील मंदावू शकते. जेव्हा चयापचय मंदावते तेव्हा शरीर हळूहळू ऊर्जा खर्च करते, ज्यामुळे कॅलरीज जमा होतात आणि लठ्ठपणा येऊ शकतो.
दुसरीकडे, जर चयापचयची प्रक्रियाची गती वाढली तर त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणजेच हायपरथायरॉईडीझमच्या रुग्णांमध्ये जर थायरॉईड संप्रेरक वाढल्याने चयापचय गती वाढली तर त्या व्यक्तीला वजन कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि अशक्तपणा यासारखी लक्षणे जाणवू शकतात. म्हणून चयापचय प्रक्रिया ही प्रत्येकाच्या शरीरात संतुलित असणे खूप महत्वाचे आहे.
मंदावलेली चयापचय प्रक्रिया कशी संतुलित करायची?
डॉक्टरांनी सांगितले की चयापचय योग्य ठेवण्यासाठी, सक्रिय राहिले पाहिजे, म्हणजेच दररोज व्यायाम करणे आणि दैनंदिन दिनचर्येत सक्रिय राहणे महत्वाचे आहे. अशातच जी लोकं दिवसा जास्त सक्रिय असतात किंवा दररोज व्यायाम करतात त्यांचा चयापचय चांगला असतो. तर दुसरीकडे अशी काही लोकं आहेत जे दिवसाचा बहुतेक वेळ बसून काम करतात. पण ते लोकं दररोज व्यायाम करतात किंवा सकाळी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वॉकला जातात त्यांचा चयापचय चांगला असतो, तर अशी माणसं बसून काम करत असले तरी त्यांचा कॅलरी वापर योग्य होत असतो.
ज्या लोकांचे चयापचय मंदावते त्यांनी ते संतुलित करण्यासाठी पौष्टिक अन्न सेवन करावे, ज्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे प्रमाण चांगले असेल, फायबरयुक्त पदार्थ असतील, कॅफिनयुक्त पदार्थ देखील चयापचय वाढविण्यास मदत करतात. निरोगी आहार आणि व्यायामाने चयापचय देखील वाढते. नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये चयापचय जलद होते. म्हणून, चयापचय प्रक्रिया वाढवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा, निरोगी आहार घ्या आणि दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List