‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शहांचे गुलाम; महाराष्ट्राला लागलेला गद्दारी व लाचारीचा कलंक: हर्षवर्धन सपकाळ

‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शहांचे गुलाम; महाराष्ट्राला लागलेला गद्दारी व लाचारीचा कलंक: हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभीमानाचा प्रदेश आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती पण आज छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. सत्तेसाठी लाचार झालेला माणूसच महाराष्ट्रातील कार्यक्रमात जय गुजरात ची घोषणा देऊ शकतो. पण स्वाभिमानी मराठी माणूस हे कदापी सहन करणार नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून पक्ष व चिन्ह गुजरातच्या मालकाने शिंदेंना दिले व मुख्यमंत्रीपदी बसवले त्या शिंदेच्या तोंडून मोदी शहा स्तुती करणे समजू शकतो पण आपल्या गुजराती मालकाला खूष करण्यासाठी चक्क जय गुजरात म्हणावे एवढी लाचारी बरी नव्हे. अमित शहा यांचा ‘वफादार’ शिलेदार होण्याच्या नादात एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राची मान शरमेने खाली घातली. महाराष्ट्राच्या सत्तेत एकापेक्षा एक नमुने बसलेत हे पुन्हा एकदा दिसले. एकनाथ शिंदे गुजरातचे नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत याचा त्यांना विसर पडला का ? असा सवाल करत महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मुंबई व महाराष्ट्र विकून गुजरातची तिजोरी भरण्याचे काम शिंदे करत आहेत. मागील 11 वर्षात महाराष्ट्रातील उद्योग, संस्था, कार्पोरेट ऑफिसेस आणि कोट्यवधी निधी हा फडणवीस आणि शिंदेंमुळेच गुजरामध्ये जात आहेत. वेदांता फॅाक्सकॅान सारखे मोठे प्रकल्प ज्यामुळे महाराष्ट्रात लाखो तरुणांना रोजगार मिळणार होता तो गुजरातला पाठवून दिला. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुणांना रोजगार नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, कुपोषण वाढले आहे पण सत्तेतील हे लाचार गुजरातची गुलामी करण्यात व्यस्त आहेत. अशा महाराष्ट्रद्रोह्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तिबेटच्या मुद्यांवर सावधगिरी बाळगा; रिजिजू यांच्या विधानानंतर चीनने हिंदुस्थानला सुनावले तिबेटच्या मुद्यांवर सावधगिरी बाळगा; रिजिजू यांच्या विधानानंतर चीनने हिंदुस्थानला सुनावले
बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचे उत्तराधिकारी कोण असणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान हिंदुस्थानचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन...
Sindhudurg News – SBI च्या अधिकाऱ्याने ज्येष्ठ नागिरकाची केली आर्थिक फसवणूक, गुन्हा दाखल
अमेरिकेसोबत व्यापार करताना डेडलाईनपेक्षा इंटरेस्ट महत्त्वाचा, हिंदुस्थान-अमेरिका ट्रेड डीलवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मोठं विधान
विमान उड्डान घेणापूर्वीच Air India चा पायलट कोसळला, रुग्णालयात केलं दाखल
Ratnagiri News – रत्नदुर्ग किल्ल्यावरून उडी घेत जीवन संपवणाऱ्या तरुणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल
Ratnagiri News – माता ना तू वैरीणी… निष्ठुरतेचा कळस; पैशांसाठी जन्मदातीने मुलाचा केला सौदा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवता? याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा; नाना पटोले यांची मागणी