County Championship – इंग्लंडमध्ये युझवेंद्र चहल चमकला; दमदार गोलंदाजी करत फलंदाजांची उडवली भंबेरी

County Championship – इंग्लंडमध्ये युझवेंद्र चहल चमकला; दमदार गोलंदाजी करत फलंदाजांची उडवली भंबेरी

युझवेंद्र चहलने इंग्लंडमध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवली असून सहा षटके त्याने निर्धाव टाकली आहेत. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यात संधी मिळाली नसली तरी, इंग्लंडच्या धर्तीवर युझवेंद्र चहलने आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवून दिला आहे. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये युझवेंद्र चहल नॉर्थम्प्टनशायर क्रिकेट क्लबकडून खेळत आहे. केंट क्लबविरुद्ध खेळताना युझवेंद्र चहलने दमदार कामगिरी केली.

नॉर्थम्प्टनशायर आणि केंट यांच्यामध्ये खेळला गेलेला सामना अनिर्णित ठरला. केंटने पहिल्या डावात 566 धावा केल्या होत्या. तर नॉर्थम्प्टनशायरने पहिल्या डावात 722 धावा करत डाव घोषित केला. पहिल्या डावात युझवेंद्र चहलला विकेट घेण्यात यश आलं नाही. परंतु दुसऱ्या डावात त्यांने सर्व कसर भरून काढत आपल्या फिरकीच जाळं पसरवलं. त्याने 30 षटकांमध्ये 51 धावा देत चार विकेट घेतल्या. त्याचबरोबर सहा षटके निर्धाव टाकली. युझवेंद्र चहलविरुद्ध खेळताना केंटच्या फलंदाजांना चांगलीच कसरत करावी लागली. त्यामुळे केंट संघ दुसऱ्या डावात 8 गड्यांच्या मोबदल्यात 160 धावांपर्यंत पोहचू शकला आणि सामना अनिर्णिती सुटला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;